photos : सलाम तिच्या देशभक्तीला! नागपुरात अंध चिमुकलीनं तब्बल अडीच तास पोहोत तलावाच्या मध्यभागी फडकवला तिरंगा
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आज राज्यभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे, नागपूरच्या एका दृष्टीहीन चिमुकलीनं 77 वा स्वातंत्र्य दिवस अतिशय वेगळ्या पद्धतीनं साजरा केला आहे.
advertisement
1/5

आज राज्यभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे, नागपूरच्या एका दृष्टीहीन चिमुकलीनं 77 वा स्वातंत्र्य दिवस अतिशय वेगळ्या पद्धतीनं साजरा केला आहे. ईश्वरी पांडे असं या 13 वर्षीय चिमुकलीचं नाव आहे.
advertisement
2/5
ईश्वरीने पुन्हा एकदा अंबाझरी तलावात तब्बल अडीच किलोमीटर अंतर पोहून तलावाच्या मध्यभागी ध्वजारोहण करण्याची कामगिरी पार पडली आहे. ईश्वरीच्या या कामगिरीचं कौतुक सर्व स्थरातून होत आहे.
advertisement
3/5
तब्बल अडीच तास पोहून ईश्वरीने अंबाझरी तलावाच्या अगदी मध्यभागी ध्वजारोहण केले आहे. गेल्या चार वर्षापासून ईश्वरी हा उपक्रम राबवत आहे. स्वातंत्र्य दिनी ती तलावाच्या मध्यभागी ध्वजारोहण करते.
advertisement
4/5
डोळस व्यक्तींना जे जमलं नाही ते या चिमुकलीने करून दाखवलं आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ईश्वरीने ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली आहे. ज्यावेळी ती परत आली तेव्हा तलावाच्या काठावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाने ईश्वरीचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
advertisement
5/5
विशेष म्हणजे ईश्वरी दृष्टीहीन आहे, अंध व्यक्तीला येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता ईश्वरीची ही कामगिरी कौतुकास्पद अशी आहे, येणाऱ्या अनंत अडचणींचा सामना करून तीने तालावाच्या मध्यभागी पोहोत जाऊन ध्वजारोहण केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
photos : सलाम तिच्या देशभक्तीला! नागपुरात अंध चिमुकलीनं तब्बल अडीच तास पोहोत तलावाच्या मध्यभागी फडकवला तिरंगा