TRENDING:

OTT Releases This Week : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर या फिल्म-सीरिजचा धमाका, क्लायमॅक्स पाहून बसेल झटका

Last Updated:
OTT Releases This Week : 24 ते 30 नोव्हेंबर या आठवड्यात ओटीटीवर अनेक फिल्म आणि सीरिज रिलीज होत आहेत. या फिल्म-सीरिजमधील क्लायमॅक्स झटका देणारे आहेत.
advertisement
1/9
OTT Releases This Week: या आठवड्यात ओटीटीवर या फिल्म-सीरिजचा धमाका
प्लॅटफॉर्मवर नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात धमाका होणार आहे. अनेक बहुप्रतीक्षित फिल्म आणि सीरिज रिलीज होणार आहेत. नेटफ्लिक्स (Netflix), प्राईम व्हिडीओ (Prime Video), जिओ हॉटस्टार (JioHotstar), झी5 (Zee5), सोनी लिव्ह (SonyLIV) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बॉलिवूड, हॉलिवूडसह साऊथचे चित्रपट आणि सीरिज पाहायला मिळतील.
advertisement
2/9
रक्तबीज 2 (Raktabeej 2) : 'रक्तबीज 2' हा सिनेमा 2023 मध्ये आलेल्या 'रक्सबीज'चा सीक्वेल आहे. एका दहशतवाद्यावर आधारित या चित्रपटाचं कथानक आहे. भारत आणि बांगलादेशात अराजकता परवण्याचं त्याचं प्लॅनिंग असतं. Zee5 वर 28 नोव्हेंबरला प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल.
advertisement
3/9
सनी संस्कारी की तुलसी कुमारी (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari) : वरुण धवन आणि जान्हवी कपूर अभिनीत 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हा सिनेमा 27 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.हा रोमँटिक, कॉमेडी चित्रपट आहे.
advertisement
4/9
कांतारा: अ लेजेंड चॅप्टर 1 (Kantara: A Legend Chapter 1) : ऋषभ शेट्टीचा बहुचर्चित 'कांतारा: अ लेजेंड चॅप्टर 1) हा चित्रपट हिंदीत 27 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांना प्राईम व्हिडीओवर पाहता येईल.
advertisement
5/9
स्ट्रेंजर थिंग्स 5 वॉल्यूम 1 (Stranger Things Season 5 Volume 1) : 'स्ट्रेंजर थिंग्स 5 वॉल्यूम 1' हा साय-फाय हॉरर सीरिजच्या शेवटच्या सीझनचा पहिला भाग आहे. येत्या 27 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर ही बहुप्रतीक्षित सीरिज रिलीज होत आहे.
advertisement
6/9
रेगई (Regai) : 'रेगई' हा तामिळ क्राइम थ्रिलर सीरिज आहे. झी 5 वर 28 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल. या सीरिजमध्ये सस्पेन्स आणि थ्रिलरचा डोज पाहायला मिळणार आहे.
advertisement
7/9
आर्यन (Aaryan) : विष्णु विश्वाल आणि सेल्वराघवन यांचा 'आर्यन' हा तामिळ क्राइम, थ्रिलर चित्रपट आहे. 28 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज होईल.
advertisement
8/9
जिंगल बेल हाइस्ट (Jingle Bell Heist) : 'जिंगल बेल हाइस्ट'मध्ये दोन छोट्या-मोठ्या चोरांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. पुढे दोघे हाइस्टच्या प्रेमात पडतात. 26 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
advertisement
9/9
द पेट डिटेक्टिव (The Pet Detective) : 'द पेट डिटेक्टिव' ही एक मल्याळम, अॅक्शन, कॉमेडी, थ्रिलर फिल्म आहे. या चित्रपटात ह्यूमर, सस्पेन्स आणि हार्टवॉर्मिंग मोमेंट्स पाहायला मिळतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
OTT Releases This Week : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर या फिल्म-सीरिजचा धमाका, क्लायमॅक्स पाहून बसेल झटका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल