TRENDING:

पुणेकर काळजी घ्या! अचानक हवा बिघडली, धोका वाढला, धक्कादायक आकडेवारी समोर

Last Updated:
Pune News: पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरातील हवा प्रदुषणात अचानक वाढ झाली आहे. हवा प्रदुषण विभागाचा अहवाल आला असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
advertisement
1/5
पुणेकर काळजी घ्या! अचानक हवा बिघडली, धोका वाढला, धक्कादायक आकडेवारी समोर
पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दिवाळीमुळे वायुप्रदूषणात वाढ झाली असून, हवेची गुणवत्ता अतिशय खराब नोंदविण्यात आली आहे. वाकड आणि शिवाजीनगर परिसरातील हवा सर्वाधिक खराब आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करण्यासोबतच इतर काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
2/5
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, पुणे परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सोमवारी दुपारी 4 वाजता 315 पर्यंत पोहोचला. ही नोंद वाकडमधील भूमकर चौकात करण्यात आली. भूमकर चौकात रविवारी AQI 300 नोंदला होता, म्हणजेच एका दिवसातच हवेची गुणवत्ता अधिक बिघडली आहे.
advertisement
3/5
पुण्यातील विविध भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांकात फरक नोंदवला गेला आहे. शिवाजीनगर येथील म्हाडा कॉलनीत हवा गुणवत्ता निर्देशांक 248 वर पोहोचला, तर पाषाणमधील पंचवटी 144, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 128, निगडी 123 आणि हडपसर 90 अशी नोंद झाली. शहरातील काही भागांत हवा अतिशय खराब तर काही भागांत मध्यम दर्जाची आहे.
advertisement
4/5
ससून रुग्णालयातील श्वसनविकार विभागाचे प्रमुख डॉ. संजय गायकवाड यांनी सांगितलं की पुण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. यातून पसरणाऱ्या धुळीमुळे प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. शिवाय दिवाळीत फटाके वाजविण्यामुळे हवा प्रदूषणात आणखी भर पडत आहे.
advertisement
5/5
ज्या ठिकाणी हवेची गुणवत्ता अतिशय खराब आहे, त्या परिसरातील नागरिकांनी मास्क वापरण्यासह योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच आरोग्यास धोकादायक फटाके न फोडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पुणेकर काळजी घ्या! अचानक हवा बिघडली, धोका वाढला, धक्कादायक आकडेवारी समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल