Asrani Family : बिझनेसमनचा मुलगा, जयपूरहून मुंबईत आला; स्टारडम मिळवूनही फॅमिली लाइमलाइटपासून दूर, असरानींच्या कुटुंबात कोण कोण?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Asrani Family: जयपूरहून मुंबईला आलेले असरानी हे त्यांच्या कुटुंबाशी अत्यंत प्रामाणिक होते. त्यांच्या कुटुंबात कोण कोण होतं? त्यांनी नेहमीच आपल्या कुटुंबाला लाइमलाइटपासून दूर ठेवलं.
advertisement
1/10

अभिनेते गोवर्धन असरानी आता या जगात नाहीत. त्यांच्या जाण्याने इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. असरानी त्यांच्या कुटुंबाशी खूप जोडलेले होते. सात भावंडे असलेल्या असरानी यांनी कधीच त्यांच्या नात्यात दुरावा येऊ दिला नाही. त्यांच्या अंत्यसंस्कारालाही फक्त त्यांचे कुटुंबीय होते. त्यांच्या कुटुंबीयांविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/10
गोवर्धन असरानी हे बॉलीवूडमधील त्या दिग्गजांपैकी एक होते. त्यांनी त्यांच्या कुटुंबाला कायम प्रसिद्धीपासून दूर ठेवले.वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबासाठी ते प्रेरणास्त्रोत होते.
advertisement
3/10
असरानी यांचा जन्म 1 जानेवारी 1941साली जयपूर येथे एका मध्यमवर्गीय सिंधी कुटुंबात झाला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे वडील जयपूरमध्ये स्थायिक झाले. त्यांनी कार्पेट विक्रीचा व्यवसाय सुरू केला. गणितात कमकुवत आणि व्यवसायात रस नसलेल्या असरानी यांनी कुटुंबाच्या अपेक्षांना झुगारून अभिनयाची निवड केली. त्यांनी सेंट झेवियर्स स्कूलमधून मॅट्रिक केले आणि राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
advertisement
4/10
शिक्षणादरम्यान त्यांनी जयपूर येथील ऑल इंडिया रेडिओमध्ये व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम करून स्वतःचा उदरनिर्वाह केला. असरानी यांना सात भावंडे आहेत. चार बहिणी आणि तीन भाऊ. संयुक्त कुटुंबात वाढलेले, असरानी नेहमीच कौटुंबिक मूल्ये समजून घ्यायचे म्हणूनच सातही भावंड शेवटपर्यंत एकत्र राहिली.
advertisement
5/10
असरानी यांच्या मृत्यपश्चात त्यांची पत्नी मंजू असरानी आहे. त्यांच्या लग्नाला 50 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं.
advertisement
6/10
मंजू असरानी नेहमीच त्यांच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक आयुष्यात असरानींचा सर्वात मोठा वाटा आहे. कठीण काळात त्या कुटुंबाचे केंद्रबिंदू होत्या. मीडियापासून नेहमीच दूर राहणारी मंजू नेहमीच असरानींच्या मागे उभ्या राहिल्या.
advertisement
7/10
1970 आणि 1980 च्या दशकात "आज की ताजा खबर" आणि "नमक हराम" या चित्रपटांच्या सेटवर असरानी आणि मंजू यांची भेट झाली होती. दोघांनी "तपस्या", "चंडी सोना", "जान-ए-बहार", "नालायक", "सरकारी मेहमान", "नारद विवाह" आणि "चोर सिपाही" यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. "आज की ताजा खबर" मधील चंपक बूमियाच्या भूमिकेमुळे त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार पुरस्कार मिळाला. या सिनेमात मंजूने केसरी देसाईची भूमिका केली होती.
advertisement
8/10
असरानी आणि मंजू यांना मुले आहेत की नाही याची माहिती समोर आलेली नाही. काही अहवालांमध्ये त्यांना मुले नाहीत असा दावा आहे. तर काहींचा दावा आहे की त्यांना एक मुलगा आहे ज्याचं नाव नवीन असरानी आहे. नवीन हा अहमदाबादमध्ये डेन्टिस्ट आहे.
advertisement
9/10
त्यांच्या जवळच्या कुटुंबात एक बहीण आणि एक पुतण्या असल्याचं बोललं जातंय. त्यांच्या अंत्यसंस्कारात हा पुतण्या मुख्य उपस्थित होता. असरानी नेहमीच म्हणायचे की कुटुंब म्हणजे संख्या नव्हे तर नातेसंबंधांची खोली आहे.
advertisement
10/10
असरानी यांनी 350 हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. त्यांच्या जाण्याने इंडस्ट्रीत निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Asrani Family : बिझनेसमनचा मुलगा, जयपूरहून मुंबईत आला; स्टारडम मिळवूनही फॅमिली लाइमलाइटपासून दूर, असरानींच्या कुटुंबात कोण कोण?