'तिला घेऊ नको'... पुण्यात शूटींगदरम्यान उषा नाडकर्णींना आला धक्कादायक अनुभव
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Usha Nadkarni Pune Shooting : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी अलीकडेच पुण्यातील एका शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगितला आहे, जो ऐकून अनेकांना धक्का बसेल.
advertisement
1/8

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी वयाच्या 75व्या वर्षीही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. बिग बॉस, मास्टर शेफ सारख्या रिअलिटी शोमध्ये त्या काम करतात.
advertisement
2/8
यांनी अलीकडेच पुण्यातील एका शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगितला आहे, जो ऐकून अनेकांना धक्का बसेल.
advertisement
3/8
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना उषा ताईंनी सांगितलं, "लता बाईंनी मध्ये मास्टर शेफ चालू असताना फोन केला. मला म्हणाल्या, उषा तुला ते किती प्रेम करतात ग. आपल्या मराठीत का नाही."
advertisement
4/8
"तर मी म्हटलं बाई मराठीत काम नाही मिळत मग उभ्या उभ्या तिकडे बसायचं आणि मग ती अशी आहे ती तशी आहे म्हणून सांगायचं."
advertisement
5/8
उषा ताईंनी पुण्यातील अनुभव शेअर केला. त्यांनी सांगितलं, "आता सुद्धा मी एक पुण्याच्या ज्वेलरची अॅड केली. तर तो मला म्हणाला, उषा ताई तुम्ही काहीच मागितलं नाही माझ्याकडे."
advertisement
6/8
"मी त्याला बोलले, म्हटलं मला भीक मागायला शिकवली नाही माझ्या आई वडिलांनी. माझं काम करायचं आणि निघायचं. पॅकअप म्हटलं की निघायचं, मी थांबतही नाही."
advertisement
7/8
"मला म्हणे दोघं जण आहेत आमच्या पुण्यातले. ते म्हणाले तिला घेऊ नको. मी म्हटलं मी काम केलंय त्यांच्याबरोबर? म्हणाले नाही. मी म्हटलं, मग तरी ते बोलले, म्हणजे मी नक्की मोठी झालेली आहे."
advertisement
8/8
उषा ताई शेवटी म्हणाल्या, "मोठ्या माणसांबद्दल नेहमी पाठून खूप बोलतात. नरेंद्र मोदींना बोलतात. पण तो माणूस काम करतो, ते लक्ष देत नाहीत. हाथी भुकने वाले, कुत्ते भुकने वाले हाथी देखता है क्या"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तिला घेऊ नको'... पुण्यात शूटींगदरम्यान उषा नाडकर्णींना आला धक्कादायक अनुभव