कपूर कुटुंबातील सुपरस्टार रोज प्यायचा 100 सिगरेट, दारूशिवाय दिवसच जात नव्हता, पण पुढे झालं असं की...
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Kapoor Family Superstar : कपूर कुटुंबात जन्मलेल्या एका सेलिब्रिटीला दररोज सिगरेट आणि दारू पिण्याची सवय होती. तो रोज मांसाहारी जेवण करत असे. पण एका व्यक्तीसाठी त्याने हे सगळं सोडून दिलं आणि संन्यासीसारखं जीवन जगायला सुरुवात केली. हा स्टार कोण होता आणि त्याचं जीवन कसं बदललं, जाणून घ्या.
advertisement
1/7

शम्मी कपूरला दारू आणि सिगरेटचं अतोनात वेड होतं. तो रोज दारू प्यायचा आणि एकही रात्र दारूशिवाय जायचा नाही. पडद्यावर जसा तो हसतमुख आणि मजा-मस्ती करताना दिसायचा, तसाच खऱ्या आयुष्यात तुसडा आणि हट्टी मानला जायचा. पण त्याच्या आयुष्यात एक असं वळण आलं ज्याने त्याला पूर्णपणे बदलून टाकलं. योगी हैडाखान बाबा यांच्या संपर्कात आल्यांनंतर शम्मी कपूरचं आयुष्य पूर्णपणे बदललं.
advertisement
2/7
शम्मी कपूर यांच्या पत्नीच्या कुटुंबाने 1974 मध्ये हैड़ाखान बाबांना घरी आमंत्रित केलं. शम्मींना त्यांना भेटण्यात काहीही रस नव्हता. ते चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते, पण कुटुंबाच्या आग्रहामुळे तिथे गेले.
advertisement
3/7
सुरुवातीला शम्मी कपूर एका कोपऱ्यात बसून बाबांच्या फोटोंचा क्लिक करत राहिले. पण अचानक त्यांना जाणवलं की बाबा त्यांच्याकडे एकटक पाहत आहेत. आणि त्या क्षणाने त्यांच्या आत काहीतरी बदल घडवून आणलं.
advertisement
4/7
आश्रमाची यात्रा आणि विलक्षण परिवर्तन या रहस्यमय अनुभवानंतर शम्मी कपूर नैनीतालजवळ असलेल्या बाबांच्या आश्रमात गेले.
advertisement
5/7
आश्रमात जाताना शम्मी कपूर यांनी बरोबर दारू, मांसाहारी जेवण आणि संगीताचं सगळं सामान घेतलं होतं, कारण त्यांना वाटत होतं की याविना त्यांचा एक दिवसही जाणार नाही. पण जेव्हा ते आश्रमात पोहोचले, तेव्हा बाबांनी हसून त्यांना म्हटलं, ‘आलेत महात्मा जी!’ हे एक वाक्य त्यांच्या मनाला भिडलं.
advertisement
6/7
आश्रमात 12 दिवस त्यांनी ना दारू प्याली, ना मांसाहार केला आणि विशेष म्हणजे त्यांना या गोष्टीची गरजही वाटली नाही. आश्रमातील शांत वातावरण आणि बाबांची उपस्थिती याने त्यांचं संपूर्ण जीवनच बदलून टाकलं. हळूहळू त्यांनी सिगरेट आणि दारू सोडली आणि संपूर्णपणे अध्यात्माच्या मार्गावर वळले.
advertisement
7/7
शम्मी कपूर यांच्या पत्नी नीला देवी सांगतात, ‘गुरुजींनी कधीही शम्मीजींवर काही लादलं नाही. ते स्वतःहून त्या मार्गाला लागले. ते बाबांसोबत यात्रा करत, साधना करत. एक काळ असा होता की ते रोज 100 सिगरेट पित होते. पण हळूहळू ती सवयही सुटली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कपूर कुटुंबातील सुपरस्टार रोज प्यायचा 100 सिगरेट, दारूशिवाय दिवसच जात नव्हता, पण पुढे झालं असं की...