TRENDING:

ऐन दिवाळीत इंडस्ट्री हळहळली; असराणीनंतर प्रसिद्ध गायकाचं निधन

Last Updated:
Bollywood Singer : लोकप्रिय गायक आणि अभिनेत्याचं दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्याच्या निधनानंतर इंडस्ट्रीतून शोक व्यक्त केला जात आहे.
advertisement
1/7
ऐन दिवाळीत इंडस्ट्री हळहळली; असराणीनंतर प्रसिद्ध गायकाचं निधन
'फकीर' फेम गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन याचे 21 ऑक्टोबर रोजी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.प्रसिद्ध संगीतकार ऋषभ टंडन यांच्या निधनामुळे संगीतसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
advertisement
2/7
ऋषभ टंडनने आपल्या गाण्यांसोबतच ‘फकीर - लिव्हिंग लिमिटलेस’ आणि ‘रशना: द रे ऑफ लाइट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली होती.
advertisement
3/7
ऋषभ आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी दिल्लीला आला होता. दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्याने जगाचा निरोप घेतला.
advertisement
4/7
ऋषभ टंडन हा बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि अभिनेता होता. संगीतावर असलेल्या प्रेमासह आपल्या शांत स्वभावासाठी तो ओळखला जात असे.
advertisement
5/7
ऋषभला पाळीव प्राण्यांचीदेखील खूप आवड होती. मुंबईतील त्याच्या घरी अनेक मांजरी, कुत्रे आणि पक्षी आहेत.
advertisement
6/7
ऋषभची अनेक गाणे अजूनही प्रदर्शित झालेली नाहीत. ऋषभच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये ‘फकीर’,'ये आशिकी', 'चांद तू', 'धू धू कर के', आणि 'फकीर की जुबानी' यांचा समावेश आहे.
advertisement
7/7
ऋषभ टंडन याच्या अकस्मात निधनामुळे संगीत आणि चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर ऋषभची शेवटची पोस्ट देखील त्याच्या वाढदिवसाचीच आहे. ही पोस्ट ऋषभच्या पत्नीने शेअर केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ऐन दिवाळीत इंडस्ट्री हळहळली; असराणीनंतर प्रसिद्ध गायकाचं निधन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल