TRENDING:

रक्षाबंधनाला गिफ्ट द्यायला बजेट नाही? पैठणीच्या ट्रेंडी वस्तू पाहून बहीण होईल खूश!

Last Updated:
रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीचा सण. आता राखीमध्ये काय गिफ्ट द्यायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही काही आयडिया तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement
1/7
रक्षाबंधनाला गिफ्ट द्यायला बजेट नाही? पैठणीच्या वस्तू पाहून बहीण होईल खूश!
रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीचा सण. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या खास सणाच्या दिवशी बहिणीला राखी बांधल्यानंतर भाऊ तिला भेट देतो.
advertisement
2/7
हल्ली बहिणीही भावांना रिटर्न राखी भेट देऊ लागल्या आहेत. आता राखीमध्ये काय गिफ्ट द्यायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही काही आयडिया तुम्हाला सांगणार आहोत. <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यातल्या</a> बाजारपेठेत या हटके वस्तू आल्या आहेत.
advertisement
3/7
सदाशिव पेठेतल्या नागनाथ पार चौकात पैठणीच्या वस्तूंचे स्वप्नगंधा हे दुकान आहे. या दुकानात रक्षाबंधनासाठी अस्सल पैठणीच्या साडीपासून बनवलेल्या वस्तू आहे. या रक्षाबंधनला पैठणीपासून बनवलेल्या वस्तू तुम्ही तुमच्या बहिणीला गिफ्ट देऊ शकता.
advertisement
4/7
या ठिकाणी पैठणीच्या कपडा पासून बनवलेल्या पन्नास रुपयांच्या स्क्रंचीज आहेत. दीडशे रुपयांना स्लिंग बॅग आहे, सुंदर अशा वेगवेगळ्या पैठणीपासून बनवलेले बटवे आहेत. याचे वेगवेगळे कॉम्बिनेशनही तुम्ही देऊ शकता.
advertisement
5/7
तुमच्या छोट्या बहिणीला देण्यासाठी सुंदर असे पैठणीचे हेअर बँड आहेत. तसेच पैठणीच्या इयरिंग्स, गळ्यातले, छोट्या क्लिप अशा पैठणीपासून बनवलेल्या वस्तू इथं मिळतील, अशी माहिती ऋतुजा गोखले यांनी दिली.
advertisement
6/7
पैठणीचा सुंदर टी कोस्टरचा सेट सध्या सर्वांचं आकर्षण ठरत असून याची किंमत 400 रुपये आहे, अशी माहिती गोखलेयांनी दिली. पैठणीच्या साडीचा पदर एका फ्रेम मध्ये लावून सुंदर असा की होल्डर देखील उत्तम पर्याय आहे.
advertisement
7/7
त्याचबरोबर अगदी युनिक पद्धतीच्या पैठणीच्या साड्यांचे कव्हर असलेल्या नोटबुक्सही इथं तुम्ही रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून देण्यासाठी खरेदी करु शकता. त्या साड्यांवर हातानं केलेली कॅलिग्राफी देखील आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
रक्षाबंधनाला गिफ्ट द्यायला बजेट नाही? पैठणीच्या ट्रेंडी वस्तू पाहून बहीण होईल खूश!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल