स्पर्धा परिक्षेत 16 वेळा नापास, पण न खचता सुरू केला व्यवसाय, आज अनेकांसाठी प्रेरणा बनला हा व्यक्ती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते आणि स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा प्रत्येक उमेदवार त्यासाठी अहोरात्र मेहनत देखील करतो. मात्र, अनेक वेळा प्रयत्न करूनही काही जणांना यश मिळतो. त्यामुळे काही जण खचून जातात आणि ते स्वप्नपूर्तीसाठी चालत असलेली वाट अर्धवट सोडून देतात. तर काही जण आपली वेगळी वाट निवडतात आणि त्यात यशस्वी होतात. आज अशाच व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. (प्राची केदारी/पुणे, प्रतिनिधी)
advertisement
1/7

ज्ञानेश्वर घाडगे, असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी जवळपास 9 वर्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC परीक्षेचा अभ्यास केला. 16 वेळा मुख्य परीक्षा दिली. मात्र, तरीसुद्धा त्यांना त्यात अपयश आले. त्यानंतर ज्ञानेश्वर यांनी मागील 2 वर्षा पासून हॉस्टेलच्या व्यवसायाला सुरुवात केली. आता त्यांनी जवळपास 7 हॉस्टेल सुरू केले आहेत. त्यांच्या या प्रवासाबाबत लोकल18 च्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला.
advertisement
2/7
पुण्यातील सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि नवी पेठ या ठिकाणी त्यांचे 7 हॉस्टेल आहेत. जवळजवळ 15 ते 16 वेळा मुख्य परीक्षा दिल्या तर 3 वेळा PSI चे मैदानी चाचणीही दिली. मात्र, त्यामध्येही त्यांना अपयश आले.
advertisement
3/7
शेवटी त्यांनी 2022 मध्ये संचिता हॉस्टेल नावाने शाखा सुरू केली. आता या दोन वर्षात त्यांनी 7 हॉस्टेल सुरू केले आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला जवळपास 1 कोटीपर्यंत उलाढालही करतात. तर महिन्याला 7 ते 8 लाख रुपयांपर्यंत नफा मिळवत आहेत.
advertisement
4/7
सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील माझं एक छोटस गाव आहे. माझी आई आणि भाऊ शेती करतात तर वडील पतसंस्थेमध्ये काम करत होते. एमपीएससी करण्यासाठी 2012 मध्ये पुण्याला आलो. मग एमपीएससीची परीक्षा खूप वेळा दिली. मात्र, खूप वेळा प्रयत्न करून अपयश आले. तेव्हा प्रथम 2022 मध्ये हॉस्टेलच्या व्यवसायाला सुरुवात केली.
advertisement
5/7
परंतु त्यासाठी पैसे हवे होते आणि घरची तेवढी आर्थिक परिस्थितीही नव्हती. त्यामुळे मित्रांकडून तसेच काही नातेवाईकांकडून पैसे घेऊन ही सुरुवात केली. सुरुवातीला भाड्याने एक हॉस्टेल सुरु करण्यासाठी जवळपास 5 लाखापर्यंत गुंतवणूक केली होती.
advertisement
6/7
एमपीएससी करत असताना एक हॉटेल सुरू केले. परंतु त्यामध्ये ही अपयश आले होते. त्यामुळे खूप घाबरलो होतो. परंतु पाहिली शाखा चांगली चालल्यामुळे मग दुसरी अशा सुरू केली. आता 7 शाखा आहेत. एका हॉस्टेलमध्ये 30 ते 40 मुली या राहतात.
advertisement
7/7
सध्या सगळ्या मिळून 200 मुली आहेत. त्यांची परिस्थिती नाही, गावाकडून आल्या आहेत, अशा मुलींना सवलत देऊन मदतही करतो. कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर जिद्द, चिकाटी, मेहनत केली तर यश हे मिळते, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर घाडगे यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
स्पर्धा परिक्षेत 16 वेळा नापास, पण न खचता सुरू केला व्यवसाय, आज अनेकांसाठी प्रेरणा बनला हा व्यक्ती