Pune Ganesh Festival : पुण्यातील मानाच्या बाप्पांची कधी होणार प्राणप्रतिष्ठापना? हे आहेत शुभमुहूर्त
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Pune Ganesh Festival : आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन उद्या मंगळवार 19 सप्टेंबर 2023 रोजी होणार असून अगदी काही तास शिल्लक राहिले आहे. शहरातील मानाच्या पाच गणपतीपैकी पाचवा केसरीवाडा गणपतीचे टिळक पंचांग नुसार 19 ऑगस्ट रोजीच आगमन झाले आहे. तर आता उर्वरित मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना जवळपास दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत होणार आहे. तर आता कोणत्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना किती वाजता होणार जाणून घेऊया! (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी)
advertisement
1/8

1. कसबा गणपती : पुण्यनगरीचं ग्रामदैवत असणारा आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी 8 वाजता उत्सव मंडपातून निघेल आणि सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी डॉक्टर आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल.
advertisement
2/8
2. तांबडी जोगेश्वरी : मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी बाप्पाची मिरवणूक सकाळी 9:30 वाजता बँड आणि ढोल ताशाच्या गजरात निघेल आणि सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्री भूषण महारुद्र स्वामी महाराजांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल.
advertisement
3/8
3. गुरुजी तालीम : मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाचं आगमन वाजत गाजत एका आकर्षक रथातून होईल तसेच दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाईल.
advertisement
4/8
4. तुळशीबाग : मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपती उत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्राच्या पालखीतून बाप्पाची मिरवणूक 9:30 वा निघेल आणि सकाळी 11:30 वाजता गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल.
advertisement
5/8
5. केसरीवाडा : टिळक पंचांगानुसार मानाच्या पाचव्या गणपतीची म्हणजेच केसरीवाड्याची प्राणप्रतिष्ठा 20 ऑगस्ट रोजी झालेली आहे.
advertisement
6/8
पुणे शहरातील इतर प्रमुख मंडळश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सवात आयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाईल.
advertisement
7/8
मंडई गणपती मंडळ : अखिल मंडई मंडळाच्या वतीने उद्या बाप्पाच्या स्वागतासाठी सकाळी 9 वाजता ओंकार रथातून मिरवणूक निघेल तसेच दुपारी 12 वाजता गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल.
advertisement
8/8
बाबू गेणू गणपती ट्रस्ट : हुतात्मा बाबू गेनू गणपती ट्रस्ट तर्फे बाप्पाची मिरवणूक सकाळी 9:30 वाजता निघेल आणि दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Ganesh Festival : पुण्यातील मानाच्या बाप्पांची कधी होणार प्राणप्रतिष्ठापना? हे आहेत शुभमुहूर्त