TRENDING:

IMD Monsoon Forecast : पुण्यात ढगफुटी; महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस, पुढील 48 तास धोक्याचे

Last Updated:
IMD Monsoon Forecast : पुण्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे, शहरात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात पुढील 48 तासांत हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7
IMD Monsoon Forecast : पुण्यात ढगफुटी; महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा
मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे.
advertisement
2/7
पुण्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे, शहरात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे. नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
3/7
दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हा मान्सून पूर्व पाऊस असेल तर पुढील एक ते दोन दिवसांत मान्सून मुंबईत धडकणार असून त्यानंतर मान्सूनच्या सरी कोसळतील.
advertisement
4/7
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
5/7
दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तर हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यात आहे.
advertisement
6/7
या काळात नुसता पाऊसच पडणार नसून महाराष्ट्रात वादळाचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात राज्यात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी इतका राहणार आहे.
advertisement
7/7
आज राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून, नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पुढील 48 तासांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
IMD Monsoon Forecast : पुण्यात ढगफुटी; महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस, पुढील 48 तास धोक्याचे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल