IMD Monsoon Update : महाराष्ट्रात आज पुन्हा मुसळधार; पाऊस झोडपणार, 12 जिल्ह्यांना हायअलर्ट
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
महाराष्ट्रात पुन्हा एकदा परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे, गेले दोन दिवस राज्यात परतीचा पाऊस चांगलाच बरसला, दरम्यान आज देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्रात पुन्हा एकदा परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे, गेले दोन दिवस राज्यात परतीचा पाऊस चांगलाच बरसला, दरम्यान आज देखील राज्यात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
2/7
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, मात्र अजूनही पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
3/7
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज कोकणात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
4/7
दुसरीकडे आज विदर्भात देखील हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
advertisement
6/7
पश्चिम महाराष्ट्रातही आज पाऊस कोसळणार आहे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
7/7
मुंबई आणि उपनगरामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे, तर राज्याच्या उर्वरीत भागात आज ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
IMD Monsoon Update : महाराष्ट्रात आज पुन्हा मुसळधार; पाऊस झोडपणार, 12 जिल्ह्यांना हायअलर्ट