Weather Alert: पुणे ते कोल्हापूर अचानक बदलली हवा, हवामान विभागाकडून अलर्ट नवा, गुरुवारचं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात अचानक मोठे बदल जाणवत आहेत. कोल्ड वेव्हचं संकट टळलं असलं तरी हवामान विभागाने नवा अलर्ट दिला आहे.
advertisement
1/7

उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीची लाट कायम आहे. 'डिटवाह’ चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्यात आकाश निरभ्र होऊ लागले आहे. आज 4 डिसेंबर रोजी राज्यात थंडीची लाट ओसरण्याची शक्यता असून, गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
advertisement
2/7
आज गुरुवारी रोजी पुणे येथील थंडीची लाट ओसरली आहे. कमाल तापमान 28.3 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11.5 अंश सेल्सिअस इतके राहील. पुणे घाटमाथा परिसरात देखील गारठा कायम राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात गारठा कायम आहे. बुधवारी कमाल तापमानाचा पारा 30.7 अंशांवर तर किमान 13.4 अंश सेल्सिअसवर राहिला. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान 15 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यातील कमाल तापमानात अंशतः वाढ होऊन पारा 20 अंशावर राहील. तसेच किमान तापमानाचा पारा 29 अंशापर्यंत राहील. आज गारठा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 31.3 अंश आणि किमान तापमान 17.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. आज सोलापुरातील तापमानात चढ-उतार जाणवेल. कमाल तापमानाचा पारा 32 अंशावर तर किमान तापमानाचा पारा 16 अंशापर्यंत राहील.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 16.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात कमाल तापमान 31 अंशावर राहील. तसेच किमान तापमान 18 अंशावर राहील.
advertisement
7/7
राज्यातील थंडीची लाट ओसरण्याची शक्यता असली तरी, गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. काही जिल्ह्यांत गारठा कायम राहून पहाटे धुक्यासह दव तर दिवसभरच्या वातावरणात थंडी राहील. दरम्यान, पुढील काही दिवसांत हवामानात मोठे बदल जाणवतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पुणे ते कोल्हापूर अचानक बदलली हवा, हवामान विभागाकडून अलर्ट नवा, गुरुवारचं अपडेट