Weather Alert: पश्चिम महाराष्ट्राचा पारा पुन्हा 15 अंशांवर, इथं सर्वात कमी तापमान, पाहा आजचं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाला होता. आता पुन्हा हवापालट होण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7

राज्यात थंडी ओसरली असून, अंशतः ढगाळ आकाश होत आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. आज 28 नोव्हेंबर रोजी मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात थंडीचा कडाका अंशत: कमी झाला असून गुरुवारी कमाल तापमान 29.4 आणि किमान 14.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. आज कमाल तापमान 30 अंशापर्यंत राहील. तर किमान तापमानात काहीशी घट होऊन ते 14 अशांवर राहील.
advertisement
3/7
साताऱ्यात गारवा पुन्हा वाढणार आहे. गुरुवारी साताऱ्यातील कमाल तापमानाचा पारा 30.6 अंशावर राहिला. तर 16.1 अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान 15 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात वातावरणातील थंडीचा जोर ओसरला आहे. आज कमाल तापमानाचा पारा 29 अंशावर तर किमान तापमान 19 अंशापर्यंत राहील. आज गारठा कमी राहून कमाल तापमानात अंशत: वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
गुरुवारी सोलापूर जिल्ह्यातील जेऊर येथे निचांकी 12.5 अंश तापमान नोंदले गेले. आज सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा 30 अंशावर राहील. तसेच किमान तापमानाचा पारा 16 अंशापर्यंत राहिल.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 18.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात कमाल तापमान 31 अंशावर राहील. तसेच किमान तापमानात 2 अंशांनी घट होऊन ते 16 अंशावर राहील. त्यामुळे गारठा वाढण्याची शक्यता आहे. तर दुपारी उकाडा कायम असेल.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत किमान तापमानाचा पारा 15 अंशावर गेल्याने थंडी कमी झाली आहे. किमान आणि कमाल तापमानात मोठी तफावत असून आता पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्राचा पारा पुन्हा 15 अंशांवर, इथं सर्वात कमी तापमान, पाहा आजचं अपडेट