Weather Alert: थंडीच्या दिवसांत उन्हाच्या झळा, कोल्हापूर ते पुणे हवामानात मोठे बदल, आजचं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. आता ऐन थंडीच्या दिवसांत उन्हाच्या झळा जाणवत आहेत.
advertisement
1/7

आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ." width="1080" height="1350" /> राज्यात थंडी पूर्णपणे ओसरली असून, अंशतः ढगाळ आकाश होत आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. आज 27 नोव्हेंबर रोजी विदर्भात किमान तापमानात घट होण्याची तसेच उर्वरित राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात थंडीचा कडाका अंशत: कमी झाला असून बुधवारी 30.6 कमाल आणि 15.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाचा पारा नोंदविण्यात आला. आज कमाल तापमान 30 अंशापर्यंत राहील. तसेच किमान तापमानात वाढ पारा 15 अंश सेल्सिअस राहिल.
advertisement
3/7
साताऱ्यातील गारठा कमी झाला आहे. बुधवारी साताऱ्यातील कमाल तापमानाचा पारा 31.0 अंशावर तर 16 अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान 15 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात वातावरणातील थंडी गायब झाल्याचे चित्र आहे. किमान तापमान 19 अंशांवर गेले असून कमाल 30 अंश सेल्सिअस आहे. आज गारठा कमी राहून कमाल तापमानात अंशत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात बुधवारी कमाल तापमान 36.2 अंश सेल्सिअसवर तर किमान तापमान 18 अंशावर राहिले. आज कमाल तापमानाचा पारा 32 अंशांवर तर किमान तापमान 17 अंशापर्यंत राहील.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 17.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात कमाल तापमान 31 अंशावर तर किमान तापमान 17 अंशावर राहील. जिल्ह्यातील ढगाळ हवामान नाहीसे झाले असले तरीही उन्हाचा पारा वाढला आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून थंडी गायब झाली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 2 ते 5 अंशांची वाढ झाली आहे. दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, वाढलेला उकाडा रात्री उशिरापर्यंत कायम राहत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: थंडीच्या दिवसांत उन्हाच्या झळा, कोल्हापूर ते पुणे हवामानात मोठे बदल, आजचं अपडेट