Weather Alert: महाराष्ट्रात आता वारं फिरलं, 24 तास महत्त्वाचे! हवामान विभागाकडून अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी महत्त्वाचा अलर्ट दिला आहे.
advertisement
1/6

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. किमान आणि आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. तसेच काही भागात ढगाळ वातावरण होत आहे. तर राज्याच्या काही जिल्ह्यांत पावसाची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 3 फेब्रुवारीला राज्यातील हवामान कसं राहील? याबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/6
मुंबईसह कोकणात हवामान मुख्यतः कोरडे राहील. पालघर, ठाणे या उत्तर कोकणातील जिल्ह्यात काहीसे ढगाळ हवामान राहून हलका पाऊस होऊ शकतो. तर सकाळी हलके धुके राहील. कमाल तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
3/6
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात हवामान मुख्यतः कोरडे ते काही प्रमाणात ढगाळ राहील. सकाळी थंडी जाणवेल. पावसाची शक्यता नसून कमाल तापमान 24 ते 27 अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान 15 ते 18 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
4/6
उत्तर महाराष्ट्रात 2 आणि 3 फेब्रुवारी रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ हवामान राहील. कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 ते 20 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
5/6
विदर्भात देखील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. सकाळी थंडी जाणवेल तर दुपारी उष्णता घाम काढणार आहे. वातावरण मुख्यतः कोरडे राहील. कमाल तापमान 30 ते 33 तर किमान तापमान 16 ते 19 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
6/6
एकंदरी, राज्यात थंडी कमी होऊन काही भागात ढगाळ वातावरण राहील. मुंबई आणि कोकणात उकाडा राहील. तर विदर्भात स्थिर हवामान पहायला मिळेल. उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रात आता वारं फिरलं, 24 तास महत्त्वाचे! हवामान विभागाकडून अलर्ट