TRENDING:

Weather Alert: 24 तासांत वारं फिरलं, महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल, IMD कडून अलर्ट

Last Updated:
Weather Alert: जानेवारी अखेर राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. थंडीचा जोर ओसरला असून हवामान विभागाने महत्त्वाचा अलर्ट दिला आहे.
advertisement
1/7
24 तासांत वारं फिरलं, महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल, IMD कडून अलर्ट
जानेवारी अखेर महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. तापमानात चढ-उतार सुरू असून थंडीचा प्रभाव कमी प्रमाणात जाणवत आहे. सकाळच्या वेळेत काही भागांत धुके, तर दुपारनंतर उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. अशातच आता पुढील पाच दिवसांत राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 31 जानेवारी रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील? जाणून घेऊ.
advertisement
2/7
कोकण विभागात हवामान प्रामुख्याने निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरात आकाश मुख्यतः स्वच्छ राहील. पावसाचा कोणताही अंदाज नसून, दुपारच्या वेळेत उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. मुंबईत कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात सकाळच्या वेळेत थोडा गारवा जाणवेल. काही भागांत सकाळी धुक्याची शक्यता असून, त्यानंतर दिवसभर हवामान कोरडे राहील. पुणे शहर आणि परिसरात सकाळी धुके, तर नंतर आकाश स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. येथे कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
4/7
मराठवाडा विभागात हवामान मुख्यतः कोरडे राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून, सकाळी हलका गारवा जाणवू शकतो. येथे कमाल तापमान 29 अंश, तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रात हवामानात बदल जाणवत असून, काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिक शहरात हवामान प्रामुख्याने निरभ्र राहील. येथे कमाल तापमान 29 अंश, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भात थंडीचा कडाका कमी झाला आहे. मात्र, काही ठिकाणी सकाळच्या वेळी गारवा जाणवू शकतो. नागपूर आणि परिसरात दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, सकाळी गारवा आणि दुपारनंतर उष्णतेचा अनुभव येऊ शकतो. नागपूरमध्ये कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यात हिवाळा संपून उन्हाळ्याचे वेध लागले आहेत. त्याआधीच काही ठिकाणी अवकाळी संकट घोंघावत आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: 24 तासांत वारं फिरलं, महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल, IMD कडून अलर्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल