Weather Alert: ऑक्टोबर अखेर पावसाचा जोर, पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळणार, पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ते कोल्हापूर 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7

बंगालच्या उपसागरातील 'मोंथा' चक्रीवादळ, अरबी समुद्रातील कमी दाब प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. आज 28 ऑक्टोबर पासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने 29 जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात सोमवारी 12.7 मिलिमीटर पावसाची आणि 31.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 31 अंशावर राहील. हवामान विभागाने सतर्कतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
3/7
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यात 13 मिलिमीटर पाऊस आणि 28.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज संपूर्ण साताऱ्यासह घाटमाथ्यावर विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 30 अंशावर राहील.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी 30 मिलीमीटर पावसाची आणि 27.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहणार असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
5/7
सोमवारी सोलापूर जिल्ह्यात 31.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी पारा 32 अंशावर राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 27.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी पारा 31 अंशावर राहण्याचा अंदाज आहे. सांगलीत हलक्या पावसासह तापमानातील चढ-उतार सुरूच आहेत.
advertisement
7/7
आज मंगळवारी महाराष्ट्राच्या बहुतांश भागात विजांसह गडगडाटी पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यास विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सोलापूर सांगलीत पावसाची शक्यता असली तरी कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: ऑक्टोबर अखेर पावसाचा जोर, पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळणार, पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट