TRENDING:

Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावर संकटाचे ढग, 48 तास महत्त्वाचे, सोलापूरसह 5 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather alert: पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून सोलापुरात पूरस्थिती गंभीर झाली आहे. आज पुन्हा हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
advertisement
1/7
पश्चिम महाराष्ट्रावर संकटाचे ढग, 48 तास महत्त्वाचे, सोलापूरसह 5 जिल्ह्यांना अलर्
बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाच्या प्रणाली पूरक ठरल्याने राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. आज 25 सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 0.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज पुणे जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्‍यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तसेच पुणे घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात बुधवारी 0.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. साताऱ्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात सोसाट्याचा वारा आणि विजांसह जोरदार पाऊस होईल.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 0.6 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमान 29.3 अंश सेल्सिअस राहिले. आज कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असून घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूरला देखील हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
5/7
सोलापूर परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे सीना, भोगावती नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज पुन्हा सोलापुरात ढगांच्या गडगडाटात जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने पुन्हा यलो अलर्ट जारी केला असून सोलापूरकरांच्या चिंता वाढणार आहेत.
advertisement
6/7
गेल्या 24 तासात सांगली शहर परिसरात 0.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच ढगाळ आकाशासह तापमान 30.9 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. आज गुरुवारी सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 4 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला असून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. सोलापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्याने स्थिती गंभीर आहे. हजारो हेक्टर शेती पाण्यात गेली असून शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यातच पुन्हा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आल्याने शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावर संकटाचे ढग, 48 तास महत्त्वाचे, सोलापूरसह 5 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल