Weather Alert: नोव्हेंबरमध्येही पावसाळा! पुणे ते कोल्हापूर विजा कडाडणार, शनिवारी पुन्हा बरसरणार, आजचं हवामान अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात सलग सातव्या महिन्यात पाऊस बरसणार आहे. नोव्हेंबरमध्येही पावसाळाच कायम राहण्याची शक्यता असून आज पुन्हा पावसाचा अंदाज आहे.
advertisement
1/7

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रांचा प्रभाव कमी झाल्याने राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. आज 1 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात शुक्रवारी 0.3 मिलिमीटर पावसाची तसेच 27.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज पुणे जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 29 अंशावर राहिल.
advertisement
3/7
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यात 26.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर 0.4 मिलिमीटर पाऊस झाला. आज संपूर्ण साताऱ्यासह घाटमाथ्यावर विजांसह हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 30 अंशावर राहील.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी 26.1 अंश सेल्सिअस तापमानाची आणि 1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी पारा 29 अंशावर राहील.
advertisement
5/7
मागील 24 तासात सोलापूर जिल्ह्यात 32.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. यावेळी पारा 33 अंशावर पोहचण्याचा अंदाज आहे.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 27.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच 0.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी पारा 31 अंशावर राहील.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. सांगली, सोलापूरसह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल-किमान तापमानात चढ-उतार जाणवतील. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: नोव्हेंबरमध्येही पावसाळा! पुणे ते कोल्हापूर विजा कडाडणार, शनिवारी पुन्हा बरसरणार, आजचं हवामान अपडेट