Weather Alert: विजा कडाडणार, रक्षाबंधनच्या दिवशी पाऊस झोडपणार, पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: रक्षाबंधनच्या दिवशीच पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे, कोल्हापूरसह पाचही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
1/7

राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत असतानाच, पावसाच्या हजेरीने काहीसा थंडावा मिळाला आहे. आज 9 ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे. उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहून विजांसह हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 0.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात संपूर्ण पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाची शक्‍यता आहे. यावेळी कमाल तापमान 30 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील. विजांच्या कडकडाटाची शक्यता असल्याने पुढील 48 तास सतर्कतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाची उघडीप राहिली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहिल. तसेच पुढील 24 तासांसाठी सातारा जिल्ह्यात सतर्कतेचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे. यावेळी विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 27.8 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 27 अंशावर राहिल. कोल्हापूर जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर जोरदार वारे आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तास कोल्हापूर जिल्ह्याला सतर्कतेचा अलर्ट जारी केला आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्हात मागील 24 तासात 13 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच 28.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 28 अंशावर राहिल. पुढील 24 तासात सोलापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
6/7
गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 0.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज गडगडाटी वादळासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 30 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाच्या उघडिपीसह तापमानात चढ-उतार सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: विजा कडाडणार, रक्षाबंधनच्या दिवशी पाऊस झोडपणार, पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांना अलर्ट