TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्रावर परतीच्या पावसाचं संकट, मंगळवारी 33 जिल्ह्यांना नवा अलर्ट

Last Updated:
मुंबई कोकणासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. पाहुयात 16 सप्टेंबर रोजी राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
1/7
महाराष्ट्रावर परतीच्या पावसाचं संकट, मंगळवारी 33 जिल्ह्यांना नवा अलर्ट
राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात पुढील दोन दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असा सर्वदूर हा पाऊस पडणार आहे. रायगड आणि छत्रपती संभाजीनगर तसेच पुण्याच्या घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई कोकणासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. पाहुयात 16 सप्टेंबर रोजी राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस विजांसह पडण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात पाच जिल्ह्यांना यलो तर एका जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली आणि सोलापूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, साताऱ्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक सह सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो.
advertisement
5/7
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट तर उर्वरित सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली वगळता सर्व नऊ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता विदर्भात देखील वर्तवण्यात आली आहे.
advertisement
7/7
दरम्यान, राजस्थान येथून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मान्सून ऑक्टोबर महिन्यात राज्यातून माघार घेईल अशी शक्यता आहे. मराठवाड्यात गेल्या चोवीस तासांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. अहिल्यानगर आणि मुंबईत देखील मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या जीविताची काळजी घेणं महत्त्वाचं असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रावर परतीच्या पावसाचं संकट, मंगळवारी 33 जिल्ह्यांना नवा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल