Weather Alert : महाराष्ट्रात बुधवारी लाट येणार, हवामान खात्याचा 2 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
19 नोव्हेंबर रोजी 2 जिल्ह्यांना गारठ्याचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत देखील थंडी वाढली असल्याचे पहायला मिळत आहे.
advertisement
1/7

राज्यात थंडीचे सत्र कायम आहे. उत्तर भारतातून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे राज्यात हाडे गोठवणारी थंडी पहायला मिळत आहे.
advertisement
2/7
राज्यातील पुणे, नाशिक, जळगाव या प्रमुख शहरात आज एक अंकी तापमान नोंदवण्यात आलं. पाहुयात 19 नोव्हेंबर रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
3/7
19 नोव्हेंबर रोजी 2 जिल्ह्यांना गारठ्याचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत देखील थंडी वाढली असल्याचे पहायला मिळत आहे. 19 नोव्हेंबर रोजी मुंबईत किमान तापमान 18 तर कमाल तापमान 33 अंश सेल्सियस एवढं राहील.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका कायम आहे. पुण्यात आज 9 अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदवलं गेलं. तर 19 नोव्हेंबर रोजी पुण्यात 10 अंश सेल्सियस एवढं तापमान पहायला मिळेल. कोल्हापूरमध्ये 18 अंश सेल्सियस तापमान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्र सर्वाधिक थंडी अनुभवत आहे. नाशिक आणि जळगावला 19 नोव्हेंबरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकमध्ये 8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. 19 तारखेला 10 अंश तापमान राहील. जळगावमध्येही पारा घसरलेलाच पहायला मिळेल.
advertisement
6/7
छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल आणि किमान तापमानात 2 अंश सेल्सियसची वाढ होण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमधील किमान तापमान 12 तर कमाल तापमान 31 अंश सेल्सियस राहील.
advertisement
7/7
विदर्भात राज्यातील इतर भागाच्या तुलनेत गारठा कमी असल्याचे पहायला मिळते. नागपूरमधील किमान तापमानात 2 अंश सेल्सियस वाढ होऊन ते 13 अंश सेल्सियस होईल. तर अमरावतीत कमाल तापमान 28 तर किमान तापमान 13 अंश सेल्सियस राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात बुधवारी लाट येणार, हवामान खात्याचा 2 जिल्ह्यांना अलर्ट