Weather Alert: पुढील 24 तास महत्त्वाचे! राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, 4 जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- local18
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पुढील 24 तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 13 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
1/7

आगामी काळामध्ये राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/7
13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. पाहुयात 13 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
3/7
मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासांमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईतील कमाल तापमान 31 अंश सेल्सियस किमान तापमान 25 च्या आसपास असेल. 13 ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगरामध्ये, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
4/7
तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याला तसेच कोल्हापूरच्या घाट भागाला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून उर्वरित धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/7
तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर वगळता जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या सर्व सात जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
6/7
विदर्भातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली हे ते चार जिल्हे आहेत. तर पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
7/7
विदर्भातील ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे सोडून उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भामध्ये 13 ऑगस्ट पासून ते 19 ऑगस्ट पर्यंत जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पुढील 24 तास महत्त्वाचे! राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, 4 जिल्ह्यांना अलर्ट