TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, येतेय हिम लाट, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
13 डिसेंबर रोजी राज्यात शीत लहरींचा इशारा नाही. तरीही राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 
advertisement
1/7
महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, येतेय हिम लाट, या जिल्ह्यांना अलर्ट
गेले काही दिवस राज्यातील विविध भागांत तीव्र थंडीची लाट होती. 12 डिसेंबर रोज शुक्रवारी देखील 5 जिल्ह्यांत थंडीची लाट होती. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा कडाका जास्त होता. शुक्रवारी जेहुर येथे 5 अंश सेल्सिअस तर धुळे येथे 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवस राज्यातील थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. 13 डिसेंबर रोजी राज्यात शीत लहरींचा इशारा नाही. तरीही राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पाहुयात, 13 डिसेंबर रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
मुंबईसह उपनगरांत निरभ्र आकाश राहून कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. कोकण विभागात देखील आता तापमानात घट बघायला मिळत आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत एक अंकी तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे थंडीचा कडाका जास्त आहे. पुण्यात धुक्यासह अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं.
advertisement
4/7
मराठवाड्यातही हुडहुडी कायम आहे. मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी 13 डिसेंबर रोजी निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांतही काहीशी अशीच स्थिती बघायला मिळू शकते.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वाधिक बोचरी थंडी उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत जाणवत आहे. प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश राहून कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं.
advertisement
6/7
विदर्भातही कडाक्याची थंडी कायम आहे. गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांत 10 अंशाच्या खाली तापमानाची नोंद झाली आहे. प्रमुख शहर असलेल्या नागपूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. पुढील काही दिवस विदर्भात थंडीचा कडाका कायम असणार आहे.
advertisement
7/7
राज्यातील विविध भागांत तीव्र थंडी जाणवत आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा जोर जास्त आहे. त्यामुळे तूर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांनी तूर पिकाची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे, येतेय हिम लाट, या जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल