TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रात आता ते दिवस परत येणार, वारं फिरलं, हवामान खात्याकडून अलर्ट

Last Updated:
वाढलेल्या गारठ्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु पुन्हा एकदा गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. 28 नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये हवामान कसे असेल पाहुयात.
advertisement
1/7
महाराष्ट्रात आता ते दिवस परत येणार, वारं फिरलं, हवामान खात्याकडून अलर्ट
राज्यामध्ये मागील काही दिवस कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे वाढलेल्या गारठ्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु पुन्हा एकदा गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. 28 नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये हवामान कसे असेल पाहुयात.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील, तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमानात आगामी काही दिवसांमध्ये घट होणार असून 3 डिसेंबरपर्यंत तापमान 18 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार आहे. यामुळे मुंबईकरांना थंडीचा अनुभव आगामी काळात मिळू शकतो.
advertisement
3/7
पुणे शहरामध्ये पुढील दोन ते तीन दिवस गारठा वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमान अगदी 13 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं. परंतु एक डिसेंबरनंतर ढगाळ आकाशाची शक्यता असून यामुळे किमान तापमानात वाढ अपेक्षित आहे.
advertisement
4/7
28 नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस एवढं राहील. परंतु 29, 30 आणि एक डिसेंबर रोजी सकाळच्या वेळी दाट धूके पडण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यात मात्र आगामी काळामध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे. 28 नोव्हेंबर रोजी संभाजीनगरमध्ये किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस एवढं राहील. तर 29 नोव्हेंबर रोजी किमान तापमान 13 अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भामध्ये अंशतः ढगाळ आकाशासह धुके राहण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये 28 नोव्हेंबर रोजी किमान तापमान 16 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस एवढं राहील. आगामी काळात विदर्भातील तापमानात चढ-उतार कायम राहणार आहेत.
advertisement
7/7
दरम्यान मागील तीन ते चार दिवस राज्यामध्ये ढगाळ आकाश असल्याने किमान तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळालं. यामुळे नागरिकांना कडाक्याच्या थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला. परंतु आता पुन्हा एकदा राज्यामध्ये गारठा जाणवण्यास सुरुवात झाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात आता ते दिवस परत येणार, वारं फिरलं, हवामान खात्याकडून अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल