TRENDING:

Weather Alert : राज्यात थंडीची लाट कायम, शुक्रवारी या जिल्ह्यांत पारा घसरणार, हवामान विभागाने दिला अलर्ट

Last Updated:
राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहे. उत्तरेकडून राज्यात शित लहरींचा प्रवाह कायम असल्याने विविध भागांत थंडीचा कडाका वाढत आहे.
advertisement
1/7
राज्यात थंडीची लाट कायम, या जिल्ह्यांत पारा घसरणार, हवामान विभागाने दिला अलर्ट
राज्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. उत्तरेकडून राज्यात शीत लहरींचा प्रवाह कायम असल्याने विविध भागांत थंडीचा कडाका वाढत आहे. धुळे जिल्ह्यांत सर्वात कमी 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तसेच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचं बघायला मिळत आहे. राज्यात पहाटे थंडीचा कडाका आणि दुपारी उन्हाचे चटके नागरिकांना सोसावे लागत आहेत. 14 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्वच भागांत मुख्यतः निरभ्र आकाश राहणार आहे. पाहुयात, 14 नोव्हेंबर रोजी राज्यातील इतर ठिकाणी तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
मुंबई आणि उपनगरात निरभ्र आकाश बघायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही कोरडे वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात मुख्यतः निरभ्र आकाश राहून कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. पश्चिम महाराष्ट्रातील इतर शहरातही कोरडे वातावरण राहून स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत निरभ्र आकाश राहून कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यांतही कोरडे वातावरण राहून स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्येही निरभ्र आकाश बघायला मिळण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. उत्तर महाराष्ट्रातील इतर शहरात देखील कोरडे वातावरण राहून स्वच्छ सूर्यप्रकाश असणार आहे. तापमानात दिवसेंदिवस घट होत असल्याने पहाटेच्या वेळी अधिक गारवा जाणवू शकतो.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. तेथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांतही कोरडे वातावरण राहून गारवा जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
उ त्तरेकडून राज्यात शीत लहरींचा प्रवाह कायम असल्याने विविध भागांत थंडीचा कडाका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच वाढत्या थंडीमुळे तूर पिकाला धोका निर्माण होत आहे. शेतकऱ्यांनी देखील पिकांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : राज्यात थंडीची लाट कायम, शुक्रवारी या जिल्ह्यांत पारा घसरणार, हवामान विभागाने दिला अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल