TRENDING:

इंजिन तुटलं अन् गाडीचा झाला चुराडा, Mahindra च्या टँकसारख्या SUV चा भयानक अपघात, पुणेकर 3 तरुण जागेवरच गेले, घटनास्थळाचे PHOTOS

Last Updated:
गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात इंदूर-अहमदाबाद महामार्गावर भरधाव SUV वरचं नियंत्रण सुटलं आणि रेलिंगला धडकली. या अपघातात तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, SUV चा फक्त सांगाडा उरला होता. 
advertisement
1/12
इंजिन तुटलं अन् गाडीचा चुराडा, Mahindra च्या SUV चा अपघात, पुण्याचे 3 तरुण ठार
भरधाव वेगात गाडी चालवू नका, असं वारंवार  सांगितलं जात असतं, पण अनेक जण वेगाचा नियम पाळत नाही, त्यामुळे मोठी किंमत चुकवावी लागले. पुण्यातील तरुण गुजरातमध्ये फिरण्यासाठी गेले होते. पण,गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात इंदूर-अहमदाबाद महामार्गावर भरधाव SUV वरचं नियंत्रण सुटलं आणि रेलिंगला धडकली. या अपघातात तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, SUV चा फक्त सांगाडा उरला होता.
advertisement
2/12
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे  गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील इंदूर-अहमदाबाद महामार्गावर हा अपघात झाला. अभिषेक यादव (२६),  सचिन बिरादार (२७) आणि चालक तेजस दगडे (२६) अशी मृतांची नावं आहे. हे तिन्ही तरुण पुण्यातील राहणारे होते.
advertisement
3/12
पुण्यातून गुजरातमधील सोमनाथ मंदिर आणि इतर ठिकाणी फिरण्यासाठी हे तिन्ही तरुण महिंद्रा XUV 3XO या नव्या कोऱ्या SUV ने प्रवास करत होते.  लिमखेडा येथील धेडेला गावाजवळ महामार्गावर पोहोचले असता अचानक वळणावर महिंद्रा XUV 3XO अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या दुभाजकाला जोरात धडकली.
advertisement
4/12
दाहोड लिमखेडा इथं धेडेला गावाजवळ रात्री २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  महिंद्रा XUV 3XO  ही लिमखेडाकडे जात होती. त्यावेळी  धेडेला गावाजवळ वळणाजवळ चालकाचं गाडीवर नियंत्रण सुटलं., त्यामुळे अनियंत्रित झालेली महिंद्रा XUV 3XO   रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला जोरात धडकली.
advertisement
5/12
हा अपघात इतका भीषण होता की, महिंद्रा XUV 3XO चा चक्काचूर झाला आहे. महिंद्रा XUV 3XO वेग जास्त होता, त्यामुळे धडकेत इंजिन हे तुटलं आणि दूरपर्यंत फेकलं गेलं. गाडीचं इंजिन हे अपघातस्थळावरून ५० फूट दूर अंतरावर आढळून आलं होतं.
advertisement
6/12
महिंद्रा XUV 3XO चं छत आणि समोरील भागाचा चक्काचूर झाला होता. गाडीचा फक्त सांगाडा उरला होता. ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा गाडीतून तिघं हे दूरपर्यंत फेकली गेली होती.
advertisement
7/12
महिंद्रा XUV 3XO दुभाजकाला धडकल्यानंतर पलटी झाली आणि सुमारे २० फूट रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन कोसळली.  या अपघातात गाडीचं इंजिन तुटलं आणि समोरील भागाचा पूर्ण चुराडा झाला. गाडीची एक बाजू पूर्णपणे कापली गेली होती.
advertisement
8/12
मोठा आवाज झाल्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना तातडीने घटनेची माहिती देण्यात आली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
9/12
कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले. चालक हा गाडीमध्ये अडकला होता. कटरच्या मदतीने गाडीचा दरवाजा कापून चालकाचा बाहेर काढलं.
advertisement
10/12
पोलिसांनी सांगितलं की, या गाडीचा वेग खूप जास्त होता. अंदाजे या गाडीचा वेग हा १२० किमीपेक्षा जास्त असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
advertisement
11/12
ज्या ठिकाणी हा अपघात झाला होता, त्या ठिकाणी वळण होतं, पण रात्रीच्या अंधारामध्ये चालकाला वळण घेता आले नसावे, त्यामुले हा अपघात घडला असेल, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
advertisement
12/12
या अपघातात दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला होता. चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. तिन्ही मृतदेह हे लिमखेडा इथं शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
इंजिन तुटलं अन् गाडीचा झाला चुराडा, Mahindra च्या टँकसारख्या SUV चा भयानक अपघात, पुणेकर 3 तरुण जागेवरच गेले, घटनास्थळाचे PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल