Mumbai Pune Express Way accident: डुलकीनं घात केला अन् काळ समोर आला! खालापूरजवळ भीषण अपघात, कारचा चक्काचूर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Mumbai Pune Express Way accident: खालापूर टोलनाक्याजवळ मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, कारचा चुराडा, पाच जण जखमी, MGM हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू, एक टोल कर्मचारी गंभीर.
advertisement
1/7

संतोष दळवी, प्रतिनिधी कर्जत: डोळ्याची पापणी लवेपर्यंत घात झाला, टोलनाक्याआधी डुलकी लागली आणि कारचा चुराडा झाला. कारचा संपूर्ण चक्काचूर झाला आहे. खालापूर टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात किती भीषण आहे ते घटनास्थळावरच्या फोटोमधून समजेल.
advertisement
2/7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज पहाटेच्या सुमारास खालापूर टोल काऊंटरजवळ एक भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने नियंत्रण गमावल्यामुळे ही कार टोल नाक्याजवळील डिव्हायडरवर जाऊन आदळली.
advertisement
3/7
या अपघातात एकूण पाच जण जखमी झाले आहेत, त्यापैकी एका टोल कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. प्राथमिक माहितीनुसार, कारचा वेग जास्त होता आणि वाहन चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
advertisement
4/7
कार थेट टोल नाक्याच्या डिव्हायडरवर जाऊन धडकली आणि हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, डिव्हायडरचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात गाडीतील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर गाडीतील इतर तीन प्रवाशांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली आहे.
advertisement
5/7
मात्र, या दुर्घटनेत डिव्हायडरवर ड्युटीवर असलेले एक टोल कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्याची माहिती मिळताच खालापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
6/7
पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम (MGM) हॉस्पिटल मध्ये हलवले. सध्या जखमींवर एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, पोलिसांनी या अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
advertisement
7/7
एक्स्प्रेस वेवर लांबचा प्रवास करणाऱ्या चालकांनी पुरेशी विश्रांती घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Mumbai Pune Express Way accident: डुलकीनं घात केला अन् काळ समोर आला! खालापूरजवळ भीषण अपघात, कारचा चक्काचूर