Pune Crime : पुण्यात संतोष माने घटनेची पुनरावृती? चारचाकी वाहनाची 3-4 गाड्यांना धडक, एकाचा जागी मृत्यू, 3 जखमी
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Pune Crime : पुणे शहरात पुन्हा एकदा संतोष माने अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

पुणे शहरात काही वर्षांपूर्वी संतोष माने या माथेफिरुने बसखाली 9 जणांना चिरडल्याची घटना घडली. या घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात वाचली.
advertisement
2/5
शहरात एका चारचाकी वाहनाने 3-4 वाहनांना उडवत पादचाऱ्यांना धडक दिली. यामध्ये एक जणाचा जागीच मृत्यू झाला असून 3 ते चारजण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
advertisement
3/5
नारायण पेठ पोलीस चौकीकडून चारचाकी वाहन झेड ब्रिजकडे येताना त्यांनी वाटेतील वाहनांना धडक दिली.
advertisement
4/5
यामध्ये 2 रिक्षांना जोरदार धडक बसली तर काही पादचाऱ्यांना देखील उडवल्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
मद्यपान केलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उमेश हनुमंत वाघमारे, (वय 48) असे वाहन चालकाचे नाव आहे. तर नटराज बाबुराव सूर्यवंशी (वय 44) असे गाडीमालकाचे नाव आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Crime : पुण्यात संतोष माने घटनेची पुनरावृती? चारचाकी वाहनाची 3-4 गाड्यांना धडक, एकाचा जागी मृत्यू, 3 जखमी