TRENDING:

Pune News : पुण्यात 40 पीएमपीएमल प्रवाशांचा जीव वाचला, भलं मोठं झाड कोसळलं पण नेमकी चूक कुणाची?

Last Updated:
Pune PMPML bus Accident : रस्त्यावर भरधाव वेगाने धावत असलेल्या पीएमपीएल बसवर ते झाड अचानक कोसळले. झाड कोसळल्याने बसचे काही प्रमाणात नुकसान झाले.
advertisement
1/7
Pune News : पुण्यात 40 पीएमपीएमल प्रवाशांचा जीव वाचला, भलं मोठं झाड कोसळलं
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली, जिथे निगडीच्या दिशेने निघालेल्या पीएमपीएल बसवर अचानक एक भलेमोठे झाड कोसळले.
advertisement
2/7
अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कोणीही जखमी झाले नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
3/7
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या शेजारी केबल टाकण्याचे काम सुरू होते. या कामासाठी झाडाच्या भोवती खोदकाम करण्यात आले होते, ज्यामुळे झाडाच्या मुळ्या सैल झाल्या होत्या.
advertisement
4/7
याच कारणामुळे, रस्त्यावर भरधाव वेगाने धावत असलेल्या पीएमपीएल बसवर ते झाड अचानक कोसळले. झाड कोसळल्याने बसचे काही प्रमाणात नुकसान झाले.
advertisement
5/7
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य हाती घेत बसमधील सर्व ४० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
advertisement
6/7
बसवर अचानक झाड पडल्यानं घटनेमुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती, ज्यामुळे वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागला. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच वाहतूक पुन्हा सुरळीत केली.
advertisement
7/7
दरम्यान, ऐनवेळी मिळालेल्या मदतीमुळे आणि प्रवाशांच्या नशिबाने, या घटनेत कोणतीही गंभीर हानी झाली नाही, ज्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune News : पुण्यात 40 पीएमपीएमल प्रवाशांचा जीव वाचला, भलं मोठं झाड कोसळलं पण नेमकी चूक कुणाची?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल