TRENDING:

Pune Rain Alert: विजा कडाडणार, वारे वाहणार, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरी आणि विजांसह पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात घटस्थापनेच्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये पाऊस कसा असेल.
advertisement
1/7
विजा कडाडणार, वारे वाहणार, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत. राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम आहे. आज सोमवार, दिनांक 22 सप्टेंबर रोजी कोकण, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरी आणि विजांसह पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात घटस्थापनेच्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये पाऊस कसा असेल.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात शून्य मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तसेच कमाल तापमानाचा पारा 30.2 अंश सेल्सिअस इतका राहिला. आज पुणे जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील, तसेच विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात रविवारी पावसाची उघडीप राहिली. आज साताऱ्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहील. पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. यावेळी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगवान वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साताऱ्यास विजांसह वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात उघडीप राहिली. यावेळी कमाल तापमान 29.9 अंश सेल्सिअस राहिले. आज कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 25 अंशावर राहील. पुढील 24 तास कोल्हापूर जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरण राहून गडगडाटी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 0.9 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला, तसेच रविवारी सोलापूर जिल्ह्यात 33.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 30 अंशावर राहील, तसेच विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
6/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची उघडीप राहिली. ढगाळ आकाशासह तापमान 31.4 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. आज सोमवारी सांगली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगवान वारे असेल.
advertisement
7/7
पुढील 24 तास राज्यात काही भागात पावसाचे वातावरण कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांना दिनांक 22 सप्टेंबर रोजी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain Alert: विजा कडाडणार, वारे वाहणार, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल