TRENDING:

IT मधील नोकरी सोडली अन् सुरू केला व्यवसाय, आता वर्षाला 15 लाखांची कमाई

Last Updated:
माती, कपडा, कागद आणि बांबू यांपासून 300 वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. या वस्तूंच्या विक्रीतून मला वर्षांला 15 लाख रुपये कमाई होत आहे
advertisement
1/7
IT मधील नोकरी सोडली अन् सुरू केला व्यवसाय, आता वर्षाला 15 लाखांची कमाई
अलिकडच्या काळात अनेक तरुण चांगली नोकरी सोडून व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. या व्यवसायाच्या माध्यामातून चांगला नफाही कमावत आहेत. अशीच कहाणी पुण्यात राहणाऱ्या शैलेश बडगुजर यांची आहे. त्यांनी 10 वर्षे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केल्यानंतर व्यवसाय सुरु करण्याचं ठरवलं. यासाठी एका कंपनीची स्थापना त्यांनी केली. या कंपनीच्या माध्यमातून 300 वेगवगेळ्या प्रकारच्या वस्तू विक्री केल्या जात असून यामधून त्यांना लाखोंची कमाई होतं आहे.
advertisement
2/7
पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या शैलेश बडगुजर यांनी 10 वर्षे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केलं. परंतु काम करत असताना ही आपली आवड नाही हे त्यांचा लक्षात आलं. यानंतर काय करायचं असा विचार त्यांचा मनात घोळत होता. तेव्हा त्यांनी आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा असं मनाशी बाळगलं आणि काजवा कंपनी सुरू केली. यामध्ये हस्तकला, हस्तशिल्प आणि आकर्षक वस्तू बनवण्याचं काम केलं जातं.
advertisement
3/7
मी सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग क्षेत्रात 10 वर्षे काम केलं. परंतु काही काळानंतर जाणवलं की ही आपली आवड नाही. मग क्रिटिव्हली काय करू शकतो म्हणजे त्याची आवड आहे तर जॉब सोडून त्याचा शोध सुरु केला. उद्योग हे एक माध्यम आहे की जे आपण निवडू शकतो. मग त्यामध्ये आपल्या आजू बाजूला शेतकरी सेंद्रिय शेती करतायत ते आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना जोडून एक प्लॅटफॉर्म तयार करता येईल का असा विचार होता.
advertisement
4/7
रावेतकडे एक इकोफ्रेंडली स्टोअर घेऊन भाजी विक्री करायला सुरुवात केली. हे एक वर्ष काम केलं. नंतर कोरोना काळात ते बंद कराव लागलं. मग इनोव्हेटिव्ह काय करता येऊ शकत तेव्हा रिक्षामध्ये ड्रायव्हर आणि प्रवासी यांच्यामध्ये विभाजन करण्यासाठी उपयुक्त असं शीट तयार केलं. थोड्या कलात्मक पद्धतीने हे बनवलं असल्याने अल्पावधीत ते लोकांना आवडलं. यातूनच काही सरकारी कार्यालयातून ऑर्डर मिळाल्या, असं शैलेश बडगुजर यांनी सांगितलं.
advertisement
5/7
यामधून मला कळालं की आपल्याकडे सोल्युशन देण्याची आवड आहे. मग यामध्ये अजून क्रियेटिव्हली आपण करू शकतो. हे इनोव्हेटिव्ह सोल्युशन त्या वेळेची गरज होती. ती पूर्ण केली. यासाठी विविध ठिकाणांहून चांगला प्रतिसाद आला. या सगळ्या काळात स्वतःची क्षमता कळली. प्रत्येक व्यक्तीत एक तरी कलागुण असतो. त्याला दिशा आणि व्यासपीठ मिळायला हवं, हे कळालं यातूनच मग ‘काजवा’चा जन्म झाला, असं शैलेश बडगुजर यांनी सांगितलं.
advertisement
6/7
मला लाकडी खेळण्याची एक आवड होती, जिव्हाळा होता. आपल्या आजूबाजूला काही कारागीर आहेत. तसेच राज्या बाहेर देखील कारागीर आहेत. त्यांच्याशी भेट झाली. मग त्यांच्याकडून काही वस्तू घेऊन त्या अ‍ॅड केल्या मग जुनं पारंपरिक खेळाच साहित्य आहे जस की पांगुळ गाडा, विटी दांडू अशी खेळणी बनवायला सुरुवात केली.
advertisement
7/7
माती, कपडा, कागद आणि बांबू यांपासून 300 वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. या वस्तूंच्या विक्रीतून वर्षांला 15 लाख रुपये कमाई होत आहे, अशी माहिती शैलेश बडगुजर यांनी दिली आहे. (प्राची केदारी, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
IT मधील नोकरी सोडली अन् सुरू केला व्यवसाय, आता वर्षाला 15 लाखांची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल