TRENDING:

3 कंटेनर अन् 45 जणांचे स्पर्म, मुंबईजवळ सुरू होतं 'विक्की डोनर 2.0' चा गुपचूप खेळ, दिल्ली-रांची कनेक्शन उघड

Last Updated:
मुंबईजवळील विरारमध्ये एक स्पर्म बँकेचा अजब स्कॅम समोर आला आहे. बेकायदेशीरपणे इथं लोकांचे स्पर्म साठवले जात होते आणि विक्री केली जात होते.  विरारमध्ये मानवी वीर्य तस्करी रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. महानगरपालिकेच्या धडक कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. 
advertisement
1/10
3 कंटेनर अन् 45 जणांचे स्पर्म, मुंबईजवळ सुरू होतं 'विक्की डोनर 2.0' चा गुपचूप खेळ, दिल्ली-रांची कनेक्शन उघड
विरार:  काही दिवसांपूर्वी विकी डोनर नावाचा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमाच्या निमित्ताने ज्या दाम्पत्यांना आपत्य होतं नाही त्यांच्यासाठी IVF प्रणाली समोर आली. आता ठिकठिकणी IVF सेंटर पाहण्यास मिळत आहे. पण, मुंबईजवळील विरारमध्ये एक स्पर्म बँकेचा अजब स्कॅम समोर आला आहे. बेकायदेशीरपणे इथं लोकांचे स्पर्म साठवले जात होते आणि विक्री केली जात होते.  विरारमध्ये मानवी वीर्य तस्करी रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. महानगरपालिकेच्या धडक कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. 
advertisement
2/10
विरारमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या नावाखाली मानवी विर्याची बेकायदेशीर साठवणूक आणि तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या धडक तपासणीत हा प्रकार समोर आला असून 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
3/10
९ मार्च २०२६ रोजी महानगरपालिकेच्या पीसीपीएनडीटी आणि एआरटी विभागाला गोपनीय माहिती मिळाली की, मनवेलपाडा रोड सबवे समोरील एका इमारतीतील गाळ्यात संशयास्पद वैद्यकीय कामकाज सुरू आहे. या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धडक दिली.
advertisement
4/10
तपासणीदरम्यान “जिवदानी सायंटिफिक” नावाने वैद्यकीय उपकरणांची कंपनी असल्याचे सांगण्यात येत होतं. मात्र प्रत्यक्ष पाहणी केल्यावर त्या ठिकाणी शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता मानवी वीर्य (स्पर्म) गोळा करणे आणि त्याची साठवणूक करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री बसविण्यात आल्याचे आढळून आले. असून या रॅकेटचे धागेद्वारे परराज्यात पसरले आहेत.
advertisement
5/10
या प्रकरणी मयुर संखे (वय ४९) आणि कमलेश खुत (वय ४८) यांच्या विरोधात सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (ART) कायदा २०२१ तसंच इतर संबंधित कायद्यांनुसार कारवाई करण्यात आली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 (अ) आणि 223 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 40 हून अधिक मानवी वीर्याचे सॅम्पल तसेच कंटेनर जप्त करण्यात आले असून फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. 
advertisement
6/10
पालिकेनं जेव्हा या गाळ्यामध्ये धडक मारली, तेव्हा तिथे उपस्थित असलेला विशाल ओवाले हा तरुण होता. त्याने या ठिकाणी आयव्हीएफ मशिन लॅमेनार असेंबल होतं, असल्याचं सांगितलं होतं.  या दुकानाचे मालक मयूर संखे व कमलेश खुत हे असून ते सध्या बाहेर गेले होते.  गाळ्याची तपासणी केली असता आयनॉक्स आणि इंडीयन ऑईल या कंपनीचे क्रायोसिल क्रायोजेनिक कंटेनर कॅपॅसिटी 3 लीटर, लीक्विड नायट्रोजन,  कंटेनर मिळून आले.  हे कंटेनर आणि  गॅस हा आयव्हीएफ मशिनमध्ये भरण्याकरिता वापरत होते.
advertisement
7/10
 या गाळ्याचे मालक आणि पार्टनर मयूर संखे आणि कमलेश खोत हे दोघे तिथे आले आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी  प्रजनन तंत्रज्ञान केंद्र / सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान बँक याची परवानगी घेतली नव्हती, तसंच कुठेही अधिकृत नोंदणी केलेली नव्हती.
advertisement
8/10
या कंटेनरमध्ये फ्रोजन सिमेनचे सॅम्पल साठवून ठेवलेले होते. हे सॅम्पल दिल्लीची क्रायो बँक,  रांची येथील इंट्रासेल सिमेन्स बँक तसंच आयएनसी सिमेन बँक पटना येथील लोक  फ्रोजन सिमेन सॅम्पल हे मागणीप्रमाणे घेऊन येत असतो. ते आलेले सिमेन आम्ही या ठिकाणी असलेल्या कंटेनरमध्ये साठवून ठेवतो आणि पुढे जसे आम्हास डॉक्टरांकडून मागणी करण्यात येते त्याप्रमाणे आम्ही डॉक्टरांकडून पैसे घेऊन विकतो, अशी कबुली दोन्ही मालकांनी दिली, 
advertisement
9/10
पालिकेनं या कारवाईत  साहित्य उपकरणे, रासायनिक पदार्थ, आयआरसी क्रायोसिल क्रायोजेनिक कंटेनर कॅपॅसिटी 3 लीटर त्यामध्ये आरटीफिसीयल इनसेमिनेशन डोनर स्पर्म सॅम्पलचे व्हायल एकूण 45 जप्त करण्यात आल्या. प्रत्येक एआयडी सॅम्पल व्हायलची तपशील यादी तसंच ३ खाली असलेले रिकामे असलेले क्रायोसिल क्रायोजेनिक नायट्रोजन कंटेनर आणि एक मोठा 55 लीटर कॅपॅसिटी लीक्विड नायट्रोजन गॅसचा कंटेनर जप्त करण्यात आला आहे.  
advertisement
10/10
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या या कारवाईमुळे वसई विरार परिसरात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या वैद्यकीय व्यवसायांबाबत मोठा धक्का बसला असून, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार कोण याचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास विरार पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
3 कंटेनर अन् 45 जणांचे स्पर्म, मुंबईजवळ सुरू होतं 'विक्की डोनर 2.0' चा गुपचूप खेळ, दिल्ली-रांची कनेक्शन उघड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल