पुणे ते छत्रपती संभाजीनगर अवघ्या 3 तासांत, गेमचेंजर प्लॅन तयार, पहिल्या टप्प्याचं काम सुरू
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar to Pune: पुणे ते छत्रपती संभाजीनगरचा प्रवास आता सुसाट होणार आहे. गेमचेंजर प्रकल्पाचं काम सुरू झालं असून लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल.
advertisement
1/7

पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवासासाठी सध्या 8 ते 9 तास लागतात. परंतु, आता एमएसआयडीसी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या तयारीत आहे. त्यामुळे हा 8-9 तासांचा प्रवास अवघ्या 3 तासांत होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार असून वाहतूक व्यवस्थेवरील ताण देखील मोठ्या प्रमाणात कमी होईल.
advertisement
2/7
पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम आधीच सुरू असून यामध्ये पुणे-शिरूर उड्डाणपुलाचा समावेश आहे. या पुलामुळे पुणे–अहमदनगर महामार्गावरील कोंडी बर्‍यापैकी कमी होणार आहे.
advertisement
3/7
दुसऱ्या टप्प्यात नव्या ग्रीनफिल्ड महामार्गाचा विकास होणार आहे. यामध्ये शिरूर ते छत्रपती संभाजीनगरचा मार्ग तयार केला जाणार आहे. या महामार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगरचा प्रवास सुसाट होणार आहे.
advertisement
4/7
तिसरा टप्पा हा प्रकल्पाचा महत्वाचा भाग असून यात शिरूर ते संभाजीनगरपर्यंतचा सहा-पदरी आधुनिक मार्ग आणि महत्त्वाच्या शहरांना, MIDC क्षेत्रांना तसेच औद्योगिक पट्ट्यांना जोडणारे बायपास मार्ग तयार केले जातील.
advertisement
5/7
पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान होणारा हा महामार्ग राज्यासाठी गेमचेंजर ठरणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील व्यापार, पर्यटन आणि उद्योगांच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. बीड, औरंगाबाद आणि आसपासच्या जिल्ह्यांत गुंतवणुकीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
advertisement
6/7
दरम्यान, पुणे ते छत्रपती संभाजीनगर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु झाली आहे याचे काम देखील लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 22 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पातील दुसरा आणि तिसरा टप्पा सहा-पदरी ग्रीनफिल्ड महामार्गाचा महत्त्वाचा भाग असणार आहे.
advertisement
7/7
आधुनिक डिझाइन, सुरक्षितता मानके आणि जलद वाहतूक या बाबी लक्षात घेऊन हा मार्ग तयार केला जात आहे. या प्रकल्पामुळे दळणवळण अधिक सुरळीत होणार असून उद्योग, पर्यटन आणि लॉजिस्टिक नेटवर्क देखील मजबूत होईल. तसेच पुणे–मराठवाडा–विदर्भ या भागांचा संपर्क जलद आणि सोपा होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पुणे ते छत्रपती संभाजीनगर अवघ्या 3 तासांत, गेमचेंजर प्लॅन तयार, पहिल्या टप्प्याचं काम सुरू