TRENDING:

Weather update : उत्तर भारत गारठला; महाराष्ट्रातही थंडीची लाट? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Last Updated:
उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आली आहे, याचदरम्यान भारतीय हवामान विभागाकडून (IMD) दाट धुक्यांचा इशाराही देण्यात आला आहे.
advertisement
1/5
उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रातही थंडीची लाट? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज
नवी दिल्ली, 24 डिसेंबर : उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आली आहे, याचदरम्यान भारतीय हवामान विभागाकडून (IMD) दाट धुक्यांचा इशाराही देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस राजधानी दिल्लीसह पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये दाट धुके पडण्याची शक्यत आहे.
advertisement
2/5
पर्वतीय प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी सुरू असल्यानं मैदानी प्रदेशांमध्ये गारठा चांगलाच वाढला आहे. शनिवारी दिल्लीच कमाल तापमान 9.6 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं आहे. हवामान विभागानुसार या भागात आणखी गारठा वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
दुसरीकडे अंदमान आणि निकोबार, तामिळनाडू आणि दक्षिण केरळमध्ये अजूनही पाऊस सुरूच आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही तामिळनाडूचे चार जिल्हे थूथुकुडी, तिरुनेलवेली, तेनकासी आणि कन्याकुमारीमध्ये पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.
advertisement
4/5
स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस गिलगिट, बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, लडाख, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या बर्फवृष्टीची शक्यता असून, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी सोबतच पावसाची शक्यता देखील आहे.
advertisement
5/5
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास राज्यात आजही कोरडं वतावरण राहणार असून, तापमानात घसरण होऊन थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather update : उत्तर भारत गारठला; महाराष्ट्रातही थंडीची लाट? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल