Vegetables price : भाज्या महागल्या, पुण्यात किलोचे दर शंभरी पार, काय आहे नेमकं कारण?
- Published by:News18 Marathi
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
वातावरणातील बदलाचा फटका नागरिकांना बसत आहे. त्याचबरोबर भाज्या आणि पालेभाज्यांच्या पिकांवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत भाज्यांच्या वाढत्या दरामुळे गृहिणींचे बजेट पुरते कोलमडून गेले आहे. (शिवानी धुमाळ, प्रतिनिधी)
advertisement
1/6

बाजारात गेल्या आठवड्यापासून भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे.
advertisement
2/6
पावसाला सुरुवात झाली असली तरी प्रमाण कमी असल्याने अनेक ठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती आहे. त्यामुळे भाज्यांचे उत्पादन कमी झाले आहे.
advertisement
3/6
भाज्यांचा पुरवठा होत नसल्याने दर गगनाला भिडले आहेत. किरकोळ बाजारात भाज्या 100 रुपये किलोच्या वर पोहोचल्या आहेत. फळभाज्यांसह पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत.
advertisement
4/6
advertisement
5/6
फळभाज्यांचे एक किलोचे दर पुढीलप्रमाणे -टोमॅटो - 70 ते 80 रुपये प्रतिकिलो भेंडी - 120 ते 140 रुपये प्रतिकिलो गवार - 150 ते 160 रुपये प्रतिकिलो वांगी - 80 ते 100 रुपये प्रतिकिलो प्लॉवर - 100 ते 120 रुपये प्रतिकिलो कोबी - 70 ते 80 रुपये प्रतिकिलो मेथी - 40 ते 50 रुपये प्रतिकिलो कोथिंबीर - 50 ते 60 रुपये प्रतिकिलो. भाज्यांच्या वाढत्या दरामुळे गृहिणींचे बजेट पुरते कोलमडून गेले आहे.
advertisement
6/6
मध्यंतरी झालेल्या पावसामुळे फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला. फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले. तर नवीन लागवडीस किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे शेतकरी दिनकर भोंडे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Vegetables price : भाज्या महागल्या, पुण्यात किलोचे दर शंभरी पार, काय आहे नेमकं कारण?