TRENDING:

Rain Alert: कोकण, विदर्भात मुसळधार, 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, 24 तास धोक्याचे!

Last Updated:
Weather Alert: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. पुढील 24 तासांसाठी 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
Rain Alert: कोकण, विदर्भात मुसळधार, 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, 24 तास धोक्याचे!
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यातच राज्यात मान्सून दाखल झाल्याने कोकणात पावसाची तीव्रता वाढली आहे. तर राज्यातील मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर कायम आहे.
advertisement
2/5
पुढील 24 तास कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
advertisement
3/5
मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यामध्ये देखील तुरळ ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/5
पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाटावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर,जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. येथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/5
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. बहुतेक जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये पावसाची तीव्रता वाढणार आहे. विदर्भातील तब्बल पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, वाशिम, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Rain Alert: कोकण, विदर्भात मुसळधार, 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, 24 तास धोक्याचे!
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल