Weather Update : राज्यात अतिमुसळधार पावसासह आणखी एक मोठं संकट; हवामान विभागाने दिला हायअलर्ट
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/6

आज काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/6
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसासोबतच तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/6
रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
4/6
ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांच्या काही भागांमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
5/6
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांना पावसासोबतच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटाचाही सामना करावा लागणार आहे.
advertisement
6/6
अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Update : राज्यात अतिमुसळधार पावसासह आणखी एक मोठं संकट; हवामान विभागाने दिला हायअलर्ट