Weather update : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, देशातील बहुतांश राज्यात आज पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय स्थिती?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
नवी दिल्ली, हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/5

नवी दिल्ली, हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दिल्लीमध्ये पाऊस आणि सोबतच थंडी असं वातावरण राहण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
दिल्लीसह पंजाब, हरियाणा, आणि उत्तराखंडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
3/5
स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अंदमान आणि निकोबार, तामिळनाडू, केरळ लक्ष्मद्वीप, राजस्थान, उत्तर पंजाब आणि हरियाणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/5
22 ते 24 डिसेंबरदरम्यान जम्मू- काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
5/5
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रात हवामान बहुतांश ठिकाणी कोरंड राहणार असून, तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात गारठा वाढला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather update : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, देशातील बहुतांश राज्यात आज पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय स्थिती?