TRENDING:

आजचं हवामान: अवकाळी पाऊस गेला, आता नवं संकट, पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा हवापलाट!

Last Updated:
Weather Update: एप्रिलच्या सुरुवातीलाच राज्यावर घोंघावणारं अवकाळी संकट काही प्रमाणात कमी झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रात आता हवामानाचं नवं संकट येण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7
आजचं हवामान: अवकाळी पाऊस गेला, आता नवं संकट, पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा हवापलाट!
राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी संकटाने तडाखा दिला. आता मात्र हवामानात पुन्हा बदल जाणवत असून नव्या संकटाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा चढत असून पुढील 24 तासांतील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
2/7
सोलापूर जिल्ह्यात आज आकाश ढगाळ राहून गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
3/7
पुण्यातील तापमानात वाढ होत असून आज 6 एप्रिल रोजी कमाल तापमान 39 तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहिल.
advertisement
4/7
सातारा जिल्ह्यातील बहुतांश परिसरास आज किमान तापमान 37 तर कमाल 24 अंश सेल्सिअस इतके राहील. पुढील एक आठवडाभर सातारा जिल्ह्यातील तापमान वाढत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
5/7
आज सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 38 तर किमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील. अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असली तरी तापमान वाढत आहे.
advertisement
6/7
कोल्हापूर जिल्ह्यातील हवामानात काहीसे बदल जाणवणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून घोंघावणारं अवकाळी संकट कमी झालं आहे. आज कमाल तापमान 37 अंश तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
7/7
आज पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमान 38.5 तर किमान तापमान 14.5 अंश सेल्सिअस राहील. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचे सावट सध्या दूर झाले असून तापमान वाढत राहणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
आजचं हवामान: अवकाळी पाऊस गेला, आता नवं संकट, पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा हवापलाट!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल