TRENDING:

Weather Alert: उष्णतेची लाट झाली, आता दुसरं संकट, पश्चिम महाराष्ट्राला धोक्याची घंटा, पुण्यात काय स्थिती?

Last Updated:
Weather Alert: मे महिन्याच्या सुरुवातीलाच सोलापूरच्या तापमानाचे उच्चांक गाठला. आता मात्र काहीसा दिलासा मिळणार असून अवकाळी बरसण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7
उष्णतेची लाट झाली, आता दुसरं संकट, पश्चिम महाराष्ट्राला धोक्याची घंटा, पुण्यात..
मागील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमानाने उच्चांक गाठला असून कमाल तापमान 44.7 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20.4 अंश सेल्सिअस इतके राहिले. सोलापूर मध्ये 44.7 इतके सर्वाधिक तापमान नोंदले गेले. तर सोलापूर पाठोपाठ सांगलीतील पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला.
advertisement
2/7
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने होरपळणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील हवामान येत्या 24 तासात बदलण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा निहाय हवामानाचे अंदाज जाणून घेऊ.
advertisement
3/7
मागील 24 तासात 44 अंशाहून अधिक तापलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पारा अंशत: कमी होऊन 42 अंशापर्यंत राहू शकतो. तसेच दुपारनंतर सोलापुरात ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होईल.
advertisement
4/7
सातारा जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा 40 अंश तर किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मागील 24 तासात साताऱ्यातील पारा 40.9 अंशांवर राहिला होतो. या काळात ढगाळ आकाशासह एक दोन वेळा गडगडाटी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
पुणे जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम असून मागील 24 तासात 40.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा अंशतः कमी होवून 39 अंशांवर राहण्याची शक्यता आहे. तसेच आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
6/7
कोल्हापुरातील पारा 39 अंशापर्यंत वाढला असून पुढील 24 तासात कोल्हापुरातील तापमानात अंशत घट राहील. कमाल 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील. दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होईल.
advertisement
7/7
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत्या 24 तासात हवामान बदलाचा अंदाज आहे. पावसाला पोषक वातावरण तयार होत असून 24 तासानंतर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात होईल. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: उष्णतेची लाट झाली, आता दुसरं संकट, पश्चिम महाराष्ट्राला धोक्याची घंटा, पुण्यात काय स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल