Pune Rain: पुणे ते कोल्हापूर आज कसं असेल हवामान? IMD कडून आलं 24 तासांचं अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Pune Rain: पश्चिम महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/6

मान्सूनची वाटचाल थांबल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाली आहे. आज 3 जून रोजी पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या उघडिपीसह तापमानात चढउतार सुर राहणार आहे. तर घाट भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/6
सातारा जिह्यात शेतीच्या कामांना गती आली आहे. सध्या पावसाने उघडीप घेतली असली तरीही आकाश साधारणपणे ढगाळ राहत आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहिल. अंशतः ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात आला आहे.
advertisement
3/6
सोलापूर जिल्ह्यातील तापमानात वाढ होत असून मागील 24 तासात पारा 34.6 अंशावर पोहोचला. तसेच पुढील 24 तासात पारा 37 अंशावर पोहचण्याचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी मात्र ढगाळ आकाशासह रिमझिम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
4/6
सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसापूर्वी झालेल्या हळद लागणीस अवकाळी पोषक ठरला आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामांनी गती घेतली आहे. मागील 24 तासात 31.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच जिल्ह्यात 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच पुढील 24 तासात तूरळक ठिकाणी हलक्या पावसासह आकाश ढगाळ असेल.
advertisement
5/6
पुणे जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ होऊन 33.6 अंश सेल्सिअस नोंद झाली. तसेच 1.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात पुण्यातील आकाश निरभ्र राहण्याचे संकेत आहेत. यावेळी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहिल.
advertisement
6/6
मान्सून कमजोर होताच पावसाने उघडीप दिली असली तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडत आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान आहे. मात्र उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain: पुणे ते कोल्हापूर आज कसं असेल हवामान? IMD कडून आलं 24 तासांचं अपडेट