TRENDING:

Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, एकाच जिल्ह्याला पावसानं घेरलं, 48 तासांसाठी अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पावसाने उघडीप घेतलीये. मात्र, एका जिल्ह्यात 48 तास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7
पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, या जिल्ह्याला पावसानं घेरलं, 48 तासांसाठी अलर्ट
यंदा जून ते सप्टेंबर चारही महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे दिसले. सप्टेंबर अखेर पर्यंत मानला जाणारा नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा कालावधी संपला असून राज्यसह पश्चिम महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली आहे. आज 3 ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्रात हवामान कसे असेल? जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात गुरुवारी पावसाची पावसाची उघडीप राहिली. यावेळी 28.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले. आज पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/7
कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी 9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 26 अंशावर राहिल. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
4/7
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच सोलापुरातील तापमानाने बत्तीशी पार केली. 2 ऑक्टोबर रोजी 32.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज सोलापुरात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील.
advertisement
5/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 28.6 अंश सेल्सिअस इतके राहिले. पुढील 24 तासात जिल्ह्यात अंशत ढगाळ आकाशासह एक दोन वेळा गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 29.7 अंश सेल्सिअस इतके राहीले. वाऱ्यासह 0.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज संपूर्ण साताऱ्यासह सातारा घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पावसाचा जोर कमी होऊन पहाटे धुके तर दिवसभर रिमझिम पावसासह कडक ऊन असे मिश्र हवामान आहे. पुण्यासह सर्व पाचही जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, एकाच जिल्ह्याला पावसानं घेरलं, 48 तासांसाठी अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल