Weather Alert : वादळ, वीज आणि पाऊस एकाच दिवशी! पश्चिम महाराष्ट्रासाठी IMD ची बिग ब्रेकिंग अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
राज्यात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली असून पश्चिम महाराष्ट्रावर वादळी पावसाचे सावट कायम आहे. आज दिनांक 11 रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
1/7

राज्यात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली असून पश्चिम महाराष्ट्रावर वादळी पावसाचे सावट कायम आहे. आज दिनांक 11 रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यांच्या तापमानातील चढ-उतार मात्र कायम आहे
advertisement
2/7
शनिवार दिनांक 10 मे रोजी नागपूर येथे राज्यातील उच्चांकी 40.6 अंश तापमानाची नोंद झाली. तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा 38.3 अंश सेल्सिअस वर सर्वाधिक उष्ण ठरला. पुढील 24 तासात असलेले जिल्हा निहाय हवामानाचे अंदाज जाणून घेऊ.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यातील कमाल पारा 35 अंश सेल्सिअस तर किमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्याची तसेच गारपीटीची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद होत आहे.
advertisement
4/7
पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मागील 24 तासात 32.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात पुण्यातील पारा 34 अंशांवर राहण्याचा अंदाज आहे. तसेच वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे.
advertisement
5/7
मागील 24 तासात कोल्हापुरातील तापमान 34.1 अंश सेल्सिअस राहिले. ढगाळ हवामान असल्याने वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. पुढील 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्यातील पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पारा कमी होऊन 38.3 अंशावर राहिला. तसेच सोलापुरात ढगाळ आकाशासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पारा 38 अंशावर राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली. मागील 24 तासात सांगलीत 35.6 अंश सेल्सिअस तापमान राहिले. तसेच येत्या 24 तासात जिल्ह्यातील तापमान 38 अंशावर राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ आकाशासह हलका रिमझिम पाऊस तसेच ढगांचा गडगडाट राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
advertisement
7/7
येत्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून कोकण, उत्तर महाराष्ट्रते मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मराठवाडा उत्तर अंतर्गत कर्नाटक, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : वादळ, वीज आणि पाऊस एकाच दिवशी! पश्चिम महाराष्ट्रासाठी IMD ची बिग ब्रेकिंग अपडेट