Pune Weather : पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला, पुण्यात काय स्थिती? पाहा हवामान अपडेट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मॉन्सूनचा प्रवास कमजोर झाल्याने राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरण्याचे संकेत देण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पश्चिम महाराष्ट्रातून विश्रांती घेतली आहे.
advertisement
1/7

मे महिन्याच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. मात्र मॉन्सूनचा प्रवास कमजोर झाल्याने राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरण्याचे संकेत देण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पश्चिम महाराष्ट्रातून विश्रांती घेतली आहे. आज दिनांक 30 मे रोजी देखिल पश्चिम महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी केवळ रिमझिम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात काल 7.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून अंतः घटलेले पुण्याचे कमाल तापमान पुन्हा 32 अंश सेल्सिअस इतके वाढणार आहे. पुढील 24 तासात पुण्यातील आकाश ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/7
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीत दिली असून 28 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात देखील पावसाची उघडी कायम असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामाना विभागाने वर्तविली आहे. कोल्हापुरातील कमल तापमानात अंशता वाढ होईल.
advertisement
4/7
मे महिन्याच्या पावसाने झोडपलेला सातारा निसर्ग सौंदर्याने बहरतो आहे. जिल्ह्यात पावसाने उघडीत घेतली असून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहिल. पुढील 24 तासात अंशतः आकाशासह तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात आला आहे.
advertisement
5/7
अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातून काढता पाय घेतला असून गेल्या 48 तासात जिल्ह्यात कुठेही पावसाची नोंद झाली नाही. मागील 24 तास 28.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच पुढील 24 तासात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
6/7
सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासात 19 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यावेळी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस इतके राहिल. लागून राहिलेल्या अवकाळी पावसाने ऊस, द्राक्ष पिकांच्या मेहनतींची कामे खोळंबली आहेत.
advertisement
7/7
तसेच हळद, आले आणि ऊस लावणीसाठी ठेवलेल्या शेतांना तळ्यांचे स्वरूप आल्याने मे महिन्याच्या शेवटी होणाऱ्या लावणी लांबणीवर पडल्या आहेत. जत, आटपाडी भागातील फळबागांवर सततच्या पावसाने रोगराईच्या प्रादुर्भावाचा फटका बसत आहे. पावसाचा जोर ओसरल्याने शेतकरी शेतांना वापसा येण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Weather : पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला, पुण्यात काय स्थिती? पाहा हवामान अपडेट