TRENDING:

Weather Alert: शनिवारी धो धो कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील या 3 जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात ऑगस्टअखेर पावसाचा जोर कायम आहे. आज पुन्हा पुणे ते कोल्हापूर 3 जिल्ह्यांच्या घाट भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
शनिवारी धो धो कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील या 3 जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट
राज्यात पावसाचा जोर वाढत असून पश्चिम महाराष्ट्रात आज पुन्हा पावसाची शक्यता आहे. पुणे ते कोल्हापूर या पट्ट्यात हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील 24 तासांचा जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुण्याच्या घाट परिसरासाठी आज देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, उर्वरित पुणे जिल्ह्यासाठी कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही. पुढील काही दिवस या भागात अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
3/5
सातारा जिल्ह्यात आज देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तास घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. या काळात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ होत आहे.
advertisement
4/5
कोल्हापूर जिल्ह्यात पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात वेगवान वारे वाहण्याचा अंदाज असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
5/5
सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र आज कोणताही सतर्कतेचा अलर्ट देण्यात आला नाही. या भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 48 तास हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: शनिवारी धो धो कोसळणार, पश्चिम महाराष्ट्रातील या 3 जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल