मनी प्लांटचं माहित नाही; पण 'ही' 3 रोपं घरात नक्कीच आणू शकतात सुख, समृद्धी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Lucky plants for home: अनेकजणांना वृक्षारोपणाची प्रचंड आवड असते. या झाडांमुळे आपल्या घरासह ऑफिसचं वातावरण पॉझिटिव्ह आणि फ्रेश राहतं. आज आपण घरात खरोखर सुख-समृद्धी आकर्षित करणाऱ्या झाडांविषयी जाणून घेऊया. (दीपक पांड्ये, प्रतिनिधी)
advertisement
1/6

अनेकजण घरात मनी प्लांटची लागवड करतात. परंतु याव्यतिरिक्तही अशी अनेक रोपं आहेत, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी नांदू शकते. शिवाय घरावर जवळपास धनवर्षावही होऊ शकतो. आज आपण अशी 3 रोपं पाहूया.
advertisement
2/6
वास्तूशास्त्रात क्रॅसुला, बांबू आणि मनी ट्री या 3 रोपांचं महत्त्व सांगितलंय. या रोपांची लागवड आपण आपल्या घरातही करू शकता आणि ऑफिसमध्येसुद्धा. या रोपांमुळे आपल्या आर्थिक अडचणी हळूहळू संपुष्टात येऊ शकतात. ही तीनही रोपं वास्तूशास्त्रात मनी प्लांटपेक्षा जास्त शक्तिशाली मानली जातात.
advertisement
3/6
क्रॅसुला हे रोप धन आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. या रोपाची जाड, चमकदार पानं नाण्यांसारखी दिसतात. हे रोप घराच्या पूर्व किंवा आग्नेय कोपऱ्यात लावण्याचा सल्ला दिला जातो. या रोपाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते, शिवाय थोड्याशा उन्हातही हे रोप जोमाने वाढतं.
advertisement
4/6
असं म्हणतात की, बांबूचं रोप सकारात्मक ऊर्जा, भाग्य आणि धन आकर्षित करतं. हे रोप पाण्यात ठेवलं जातं, त्यामुळे त्याची जास्त देखरेख करण्याची आवश्यक नसते. शिवाय हे रोप घरात कुठेही ठेवता येतं, परंतु ते आग्नेय दिशेत ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. 3, 5 किंवा 8 मुळांचं बांबूचं रोप अतिशय लकी मानतात.
advertisement
5/6
मनी ट्री हे 'गुड लक ट्री' म्हणूनही ओळखलं जातं. हे <a href="https://news18marathi.com/religion/vastu-tips-marathi-this-simple-remedies-of-tulsi-mhpd-1137538.html">रोप</a> सजावटीसाठी वापरतातच, शिवाय यामुळे घरात धन, समृद्धीचं आगमन होतं, असंही म्हणतात. या रोपाची 5 पानं धन, आरोग्य, समृद्धी, बुद्धी आणि भाग्याचं प्रतीक मानली जातात. हे रोपही घराच्या आग्नेय दिशेत लावण्याचा सल्ला दिला जातो. त्याला आठवड्यातून एकदा पाणी आणि दररोज भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो.
advertisement
6/6
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/if-you-repeatedly-get-hair-in-food-it-can-be-sign-of-dosha-mhij-1197839.html">धार्मिक</a> <a href="https://news18marathi.com/religion/">श्रद्धेवर</a> आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
मनी प्लांटचं माहित नाही; पण 'ही' 3 रोपं घरात नक्कीच आणू शकतात सुख, समृद्धी!