TRENDING:

मोठं सक्सेस मिळण्यापूर्वी झोपेत दिसतात 'ही' 5 स्वप्न, रातोरात बदलतं नशीब!

Last Updated:
स्वप्नशास्त्रानुसार, झोपेत पडणारी प्रत्येक स्वप्ने निरर्थक नसतात. ती आपल्या भविष्यातील घडामोडींचे संकेत देत असतात. अनेकदा आपण एखाद्या मोठ्या यशाच्या उंबरठ्यावर असतो, पण आपल्याला त्याची कल्पना नसते.
advertisement
1/7
मोठं सक्सेस मिळण्यापूर्वी झोपेत दिसतात 'ही' 5 स्वप्न, रातोरात बदलतं नशीब!
स्वप्नशास्त्रानुसार, झोपेत पडणारी प्रत्येक स्वप्ने निरर्थक नसतात. ती आपल्या भविष्यातील घडामोडींचे संकेत देत असतात. अनेकदा आपण एखाद्या मोठ्या यशाच्या उंबरठ्यावर असतो, पण आपल्याला त्याची कल्पना नसते.
advertisement
2/7
अशा वेळी आपली अंतर्मीने आपल्याला स्वप्नांच्या माध्यमातून शुभ संकेत देतात. जर तुम्हाला खालीलपैकी काही गोष्टी स्वप्नात दिसत असतील, तर समजून जा की तुमचे नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत.
advertisement
3/7
उडता पक्षी पाहणे: स्वप्नात आकाशात उंच उडणारा पक्षी पाहणे हे अत्यंत शुभ मानले जाते. हे तुमच्या प्रगतीचे आणि यशाचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही लवकरच तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात मोठी भरारी घेणार आहात. जर पक्षी तुमच्या दिशेने येत असेल, तर आनंदाची बातमी लवकरच मिळणार असा त्याचा अर्थ होतो.
advertisement
4/7
नखे काढणे: स्वप्नात स्वतःची नखे काढताना पाहणे हे सकारात्मक बदलाचे लक्षण आहे. हे स्वप्न सूचित करते की, तुम्ही तुमच्या आयुष्यातील जुन्या अडचणी, अडथळे किंवा कर्जाच्या ओझ्यापासून लवकरच मुक्त होणार आहात. हे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होण्याचे आणि शत्रूंवर विजय मिळवण्याचे संकेत आहे.
advertisement
5/7
बाग किंवा हिरवळ: स्वप्नात हिरवेगार झाडे, बागा किंवा चहूबाजूला पसरलेली हिरवळ दिसणे हे समृद्धीचे लक्षण आहे. हिरवा रंग हा पॉझिटिव्हिटी आणि नवीन सुरुवातीचा कारक आहे. असे स्वप्न पडल्यास घरात सुख-शांती येते आणि अनपेक्षित धनलाभाचे योग जुळून येतात.
advertisement
6/7
वाहती नदी: स्वप्नात स्वच्छ वाहते पाणी किंवा नदी पाहणे हे सूचित करते की तुमच्या आयुष्यातील समस्या आता संपणार आहेत. ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह अडथळे पार करून पुढे जातो, तसेच तुमचे जीवनही आता प्रगतीच्या मार्गावर वेगाने धावणार आहे. हे स्वप्न रखडलेली कामे पूर्ण होण्याचे लक्षण आहे.
advertisement
7/7
चंद्र पाहणे: स्वप्नात पूर्ण चंद्र पाहणे हे यशाचे सर्वोच्च शिखर गाठण्याचे संकेत आहे. चंद्र हा शांतता आणि भाग्याचा कारक आहे. जर तुम्हाला तेजस्वी चंद्र दिसला, तर समजून जा की समाजात तुमचा मान-सन्मान वाढणार आहे आणि तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला मोठे यश मिळवून देणार आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
मोठं सक्सेस मिळण्यापूर्वी झोपेत दिसतात 'ही' 5 स्वप्न, रातोरात बदलतं नशीब!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल