Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेची Bigg Boss Marathi 6 मध्ये एन्ट्री ? अखेर चर्चांवर सोडलं मौन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Shreyas Talpade Break Silence on Bigg Boss Marathi 6 Entry : अभिनेता श्रेयस तळपदे बिग बॉस मराठी 6 मध्ये एन्ट्री घेणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. अखेर श्रेयसनं या चर्चांवर मौन सोडलं आहे.
advertisement
1/8

बिग बॉस मराठी 6 सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी असताना अभिनेता श्रेयस तळपदे हा बिग बॉसमध्ये एन्ट्री घेणार असल्याची माहिती समोर आली. पिंकविलच्या वृत्तानुसार श्रेयस तळपदे हा बिग बॉस मराठी 6 मध्ये स्पर्धक म्हणून जाणार असल्याचं सांगण्यात आलं.
advertisement
2/8
सध्या सोशल मीडियावर आणि मनोरंजनविश्वात अभिनेता श्रेयस तळपदे बिग बॉस मराठी 6 मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी प्रचंड आनंद व्यक्त केला होता.
advertisement
3/8
तर अनेकांनी श्रेयसच्या गेमप्लेबाबत तर्कवितर्क लावायला सुरुवात केली होती. खरंच श्रेयस तळपदे बिग बॉस मराठी 6 मध्ये जाणार का असा प्रश्न प्रेक्षकांच्या मानात होता. अखेर श्रेयसनं या चर्चांवर मौन सोडलं आहे.
advertisement
4/8
श्रेयस तळपदे यांनी बिग बॉस मराठी 6 मध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. Zoomशी बोलताना श्रेयस तळपदेनं सांगितलं, "आजकाल अशा घटना फारच क्वचित घडतात. या निराधार अफवा आहेत. कृपया त्याकडे दुर्लक्ष करा. दुर्दैवाने कलाकार हे अनेकदा सहज टार्गेट बनतात आणि काही लोक लक्ष वेधून घेण्यासाठी कोणत्याही थराला जातात."
advertisement
5/8
श्रेयस तळपदेनं दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर अखेर तो बिग बॉस मराठी 6 च्या घरात जाणार नसल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल आहे.
advertisement
6/8
बिग बॉस मराठी 6 बाबत सध्या अनेक कलाकारांची नावं चर्चेत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही शो सुरू होण्याआधी संभाव्य स्पर्धकांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यातील अनेक नावं ही अफवा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
advertisement
7/8
श्रेयस तळपदे ते बिग बॉस मराठी 6 मध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट झालं मग घरात नेमकं जाणार कोण? कोणते स्पर्धक असणार याची उत्सुकता सर्वांना आहे. अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठी 6 होस्ट करणार आहे.
advertisement
8/8
घरात कोणते स्पर्धक जाणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे. भाऊ कोणाची कशी शाळा घेणार, स्पर्धकांचं कसं स्वागत करणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेची Bigg Boss Marathi 6 मध्ये एन्ट्री ? अखेर चर्चांवर सोडलं मौन